quarantine-center.png 
नाशिक

धक्कादायक! तास -दोन तास नव्हे, तर तब्बल ५ दिवस चुकून ठेवले कोरोनाबाधितांसोबत?? काळे कुटुंबीयांची थरारक आपबिती!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोरोनाची लक्षणे नसल्याचे सांगत डिस्चार्ज दिला असला, तरी मनातील भीती त्यांना स्वस्थ बसू देत नाही. कोविड सेंटरमधील अनागोंदी कारभारावर वचक असायला हवा अन्यथा इतरांच्या चुकांमुळे अनेकांचे जीव जातील, अशी भावना व्यक्त होत आहे. काळे कुटुंबियांची धक्कादायक आपबिती..

अजब उत्तर ऐकूण सर्वांचीच गाळण उडाली.

काळे कुटुंबातील एका सदस्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर ४ जुलैला त्यांना तातडीने महापालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाच-सहा दिवसांच्या उपचारानंतर त्यांना मेरी येथील डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृहात हलविण्यात आले. त्याच ठिकाणी काळे कुटुंबातील अन्य सात सदस्यांनादेखील ४ जुलैपासून क्वारंटाइन करण्यात आले होते. दरम्यानच्या काळात कुटुंबातील सहा सदस्यांना निगेटिव्ह अहवाल आल्याने घरी सोडून देण्यात आले. तर, दोघांना अहवाल प्रलंबित असल्याचे कारण देत वसतिगृहातच ठेवण्यात आले. एक- दोन नव्हे, तर तब्बल पाच दिवस उलटूनही अहवाल येत नसल्याने व जेवण, नाश्ता, औषधांसाठीही कोणी विचारणा करत नसल्याने हे कुटुंबीय वैतागले अन्‌ त्यांनी थेट कार्यालय गाठून जाब विचारला. मात्र, त्यावेळी मिळालेले अजब उत्तर ऐकूण सर्वांचीच गाळण उडाली. तुम्हाला कोरोना नाही, चुकून तुम्हाला थांबविण्यात आल्याचे सांगत हा प्रकार अंगलट येऊ नये, या भीतीने तातडीने डिस्चार्ज देण्यात आला. 

सातपूरच्या काळे कुटुंबीयांची आपबिती 

कोरोनाबाधित म्हटल्यावर मित्रमंडळी, नातेवाईकच नव्हे, तर कुटुंबीयसुद्धा दोन हात लांब राहतात. परंतु एकापेक्षा अधिक कोरोनाग्रस्तांबरोबर तास, दोन तास नव्हे, तर तब्बल पाच दिवस राहावे लागण्याची वेळ सातपूरच्या मोठा राजवाडा भागातील काळे कुटुंबीयांवर आली. विशेष म्हणजे, कोरोना पॉझिटिव्ह असेल तर उपचार का नाही, अशी विचारणा केल्यानंतर, ‘माफ करा चुकून तुमचे नाव आले’, असे म्हणत त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. 


कोविड सेंटरमधील अनागोंदी 
काळे कुटुंबातील दोन सदस्यांना अहवाल प्रलंबित असल्याचे कारण देऊन ज्या वसतिगृहात थांबविण्यात आले तेथे कोरोनाबाधित रुग्णदेखील आहेत. त्यामुळे पाच दिवस कोरोनाबाधितांसोबत राहावे लागल्याने काळे कुटुंबीयांची भीतीने गाळण उडाली. कोरोनाची लक्षणे नसल्याचे सांगत डिस्चार्ज दिला असला, तरी मनातील भीती त्यांना स्वस्थ बसू देत नाही. कोविड सेंटरमधील अनागोंदी कारभारावर वचक असायला हवा अन्यथा इतरांच्या चुकांमुळे अनेकांचे जीव जातील, अशी भावना व्यक्त होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russia Ukraine War : रशियाचा भारतीय कंपनीच्या औषध प्रकल्पावर ड्रोन हल्ला; एकाचा मृत्यू, मोठे नुकसान

माढ्यात आढळला दीडशे वर्षे 'लुप्त' मानल्या गेलेल्या प्रजातीतील जीव; ३६० अंशात पाहणारा 'इंद्रधनुष्य कोळी' शोधला!

Delhi News: जंतर-मंतरवर आंदोलनात खळबळजनक घटना! पोलिसांकडून महिला पत्रकाराचा लैंगिक छळ

Latest Marathi News Live Update : आम्ही काही 'व्होट बँक' नाही आणि आम्हाला आमचे हक्क मिळालेच पाहिजेत: असदुद्दीन ओवेसी

Stone Crusher: मलठणमध्ये स्टोन क्रशरच्या ब्लास्टिंगचा फटका; शेतजमिनींसह हजारो फळझाडांचे नुकसान

SCROLL FOR NEXT