MLA Bachu Kadu speaking at a meeting of Prahar Divyang Association. Officials of the organization on the platform esakal
नाशिक

Bachhu Kadu: दिव्यांगांना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रयत्नशील : आमदार बच्चू कडू

सकाळ वृत्तसेवा

Bachhu Kadu : तालुका दिव्यांग कमिटीला आदर्श प्रहार भूषण पुरस्कार मिळाल्याची बाब अभिमानास्पद आहे. प्रत्येक दिव्यांग बांधव स्वाभिमानी व स्वावलंबी बनविण्यासाठी आपले प्रयत्न आहेत, असे प्रतिपादन माजी मंत्री व आमदार बच्चू कडू यांनी केले. (MLA Bachhu Kadu statement Striving to make disabled self reliant nashik)

येथील मातोश्री नर्मदा लॉन्समध्ये झालेल्या दिव्यांग प्रहार संघटनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर माजी आमदार राजाभाऊ वाजे, सीमंतिनी कोकाटे, भाजपचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे, तालुका प्रभारी जयंत आव्हाड, माजी नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले,

प्रहारचे जिल्हाध्यक्ष शरद शिंदे, प्रहार दिव्यांग संघटनेचे राज्याध्यक्ष बापूराव कान्हे, कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर ढोली, राज्य समन्वयक संध्या जाधव, नायब तहसीलदार वराडे, दिलीप दिघे, रवींद्र टिळे, ललित पवार, गांगुर्डे, संतोष मानकर, दत्ता वायचळे, रणजित आंधळे, वावीचे सरपंच विजय काटे आदी उपस्थित होते.

पुरवठा विभागाने दिव्यांगासाठी पत्रिका तयार केल्या होत्या. संजय गांधी योजनेची १०० प्रकरणे मंजूर झाल्याची माहिती संघटनेने दिली. तालुक्यात ५ टक्के निधी दिव्यांगांना वाटप केल्याचे सांगण्यात आले. आमदार कडू यांचे ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

२१ जणांना दिव्यांग गौरव पुरस्कार

सिन्नर तालुका प्रहार दिव्यांग संघटनेतर्फे दोन्ही पायांनी अपंग असलेल्या जवळपास २१ दिव्यांग बांधवांचा दिव्यांग गौरव पुरस्कार देऊन गौरव झाला.

त्यात पत्नी-पत्नींचाही समावेश होता. संघटनेचे तालुकाध्यक्ष अरुण पाचोरे, कार्याध्यक्ष नंदू शिरसाठ, सचिव भगवान पगर, संपर्कप्रमुख दौलत ढोली, चंदू पवार, आनंद सातभाई, नामदेव आडके, संदीप आव्हाड, ज्ञानेश्वर ढोली, सोमनाथ आंधळे, कैलास दातीर, महेश भोसले गिरीश गोळेसर, रघुनाथ पावसे, सुदाम पावसे, बाळू सहाणे, वैशाली अनवट, मालन आव्हाड, सीमा बकळे, कविता खैरनार यांनी मेळाव्याचे नियोजन केले.

निधी कमी पडणार नाही

दिव्यांगांसाठी अतिरिक्त अन्नधान्याचा लाभ मिळावा, यासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत बोलणे झाले असून, त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आमदार कडू यांनी सांगितले. दिव्यांगांसाठी स्वतंत्र घरकुल योजना असावी, यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत बोलणे झाल्याचे ते म्हणाले.

दिव्यांगासाठी अनेक योजना व कायदे आहेत. दिव्यांगांच्या लाभासाठी मुख्यमंत्री कोणताही निधी कमी पडू देणार नसल्याचा आशावाद आमदार कडू यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Russia Relations: ''भारत-रशिया मिळून दहशतवादाला चोख उत्तर देणार'', परराष्ट्र मंत्र्यांचा रशियातून इशारा

Farmer ID : फार्मर आयडी नोंदणीत गोंधळ; सातबारा एकाचा, आधार लिंकिंग दुसऱ्याचे!

MP Nilesh Lanke : पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी; खासदार नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Maharashtra Latest News Update: विधीमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीची खोपोली ते कुसगाव या मिसिंगलिंक प्रकल्पास भेट

Mokhada News : जगण्यासाठी छळ, मरणानंतर यातना; मोखाड्यातील आदिवासींच्या नशिबाचे दुष्टचक्र

SCROLL FOR NEXT