MLA Hiraman Khosakar esakal
नाशिक

केंद्राने सर्वसामान्यांना महागाईच्या खाईत लोटले - आमदार खोसकर

गोपाल शिंदे


घोटी (जि. नाशिक) : देशात केंद्र सरकारने शेतकरी, बेरोजगार युवक व कामगारांसह सर्वसामान्यांना महागाईच्या खाईत लोटून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. केंद्र महागाई आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत नाही. यामुळे शेतकरी व सर्वसामान्य मेटाकुटीला आले आहेत. सुज्ञ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावताना केंद्र सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी उभे राहिले पाहिजे. अन्यथा देशात खासगीकरण होऊन सर्वसामान्य माणूस नेस्तनाबूत व्हायला वेळ लागणार नाही. आठ महिन्यांपासून शेतकरी दिल्लीत आंदोलन करत आहे. शेकडो आंदोलक शहीद झाले आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांना दहशतवादी ठरवतोय हे पाप एक दिवस उलटणार हे केंद्राने लक्षात ठेवावे. तिन्ही कृषी कायद्यांना आमचा विरोध असून, ते केंद्र सरकारने मागे घ्यावेत; अन्यथा यापुढे उग्र स्वरूपात आंदोलन करण्याचा इशारा आमदार हिरामण खोसकर यांनी दिला.

भारत बंद व केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात घोटी बसस्थानक येथे झालेल्या सर्वपक्षीय आंदोलनादरम्यान ते बोलत होते.


मुंबई-नाशिक महामार्ग बंद करण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला. मात्र नायब तहसीलदार प्रवीण गोंडाळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी रास्ता रोको बंद करत निवेदन स्वीकारत शासनाच्या भूमिकेला आंदोलकांनी सहकार्य केले. केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्याविरोधात सर्वच पदाधिकाऱ्यांनी भाषणात ताशेरे ओढले. दरम्यान वाढलेली महागाई, बेरोजगारी, प्रकल्पबधितांच्या प्रश्नांवर केंद्र सरकारला धारेवर धरले. भाषणांनंतर बसस्थानक ते भंडारदरा चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या वेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. नायब तहसीलदार प्रवीण गोंडाळे यांना सर्वपक्षीय निवेदन देत मोर्चाची सांगता झाली.

काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष बाळासाहेब कुकडे, ‘सीटू’चे जिल्हा नेते देवीदास आडोळे, माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन माळी, ज्येष्ठ नेते बाळासाहेब वालझाडे, उत्तम भोसले, ॲड. संदीप गुळवे, तालुकाध्यक्ष रामदास धांडे, निवृत्ती कातोरे, युवक नेते भास्कर गुंजाळ, ईश्वर सहाणे, जगन जगताप, समता परिषदेचे अध्यक्ष शिवा काळे, सीटूचे तालुकाध्यक्ष दत्ता राक्षे, चंद्रकांत लाखे, चंद्रकांत दुभाषे, आप्पा भोले आदींसह सीटू, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I : वैभव सूर्यवंशीचे पदार्पण नाहीच, संजू सॅमसन संघात कायम; पहिल्या ट्वेंटी-२०साठी भारताची संभाव्य Playing XI

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळी वाजवा आंदोलन

अभिनेत्रीसोबत भररस्त्यात गैरवर्तन; बहिणीसमोरच अनोळखी व्यक्तीचं लाजिरवाणं कृत्य, अभिनेत्रीने सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव

T20 Series : वैभव सूर्यवंशीचं आज पदार्पण? कुणाला बाहेर बसवणार? इंग्लंडविरुद्ध पहिला टी२० सामना, भारताची परीक्षा

SCROLL FOR NEXT