Jayakumar Rawal discussing drought issue with Chief Minister Eknath Shinde. esakal
नाशिक

Drought News : खानदेशात कोरडा दुष्काळ जाहीर करावा; आ. रावल यांची मुख्यमंत्री शिंदेंशी चर्चा

सकाळ वृत्तसेवा

Drought News : खानदेशात सरासरीच्या तुलनेत कमी पर्जन्यमान झाले आहे. पावसाने दीड महिन्यापासून ओढ घेतली आहे. त्यामुळे खरिपातील पिके धोक्यात आली आहेत. आता पाऊस झाला तरी पिकांना जीवनदान मिळेल, अशी शक्यता नाही. (MLA Jaykumar Rawal demanded that dry drought should be declared in Khandesh dhule news)

त्यामुळे खानदेशात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी माजी मंत्री तथा शिंदखेडा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबईत चर्चेवेळी केली.

ते म्हणाले, की पावसाअभावी खरिपातील पिके हातची गेली आहेत. शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पावसाअभावी जलस्रोतांची पातळी खालावली आहे. त्यामुळे भाजीपाला व इतर लागवडीवर परिणाम झाला आहे. कापसाची वाढ खुंटली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या सर्व स्थितीचा शेतीप्रधान खानदेशातील अर्थकारणावर विपरीत परिणाम होणार आहे. शिंदखेडा मतदारसंघात बहुतांश गावांत पिण्याच्या पाण्याचीही मोठी समस्या निर्माण झाली आहे. पाऊस नसल्याने जनावरांच्या चाऱ्याचाही मोठा प्रश्न आहे.

ही स्थिती लक्षात घेता खानदेशात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, रोहयोची कामे सुरू करावी, विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करावे, पीक विमा मंजूर करून काही रक्कम अग्रीम द्यावी, अशी मागणी आमदार रावल यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारतीय रणरागिणींनीही पाकिस्तानला दाखवला इंगा, वर्ल्ड कप सामन्यात चारली पराभवाची धूळ

World Cup 2025: भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर हस्तांदोलन केलं की नाही? सामन्यानंतर काय घडलं जाणून घ्या

Video: D Gukesh विरुद्ध विजय मिळवताच नाकामुरानं 'किंग' प्रेक्षकांमध्ये फेकला, अमेरिकन खेळाडूच्या सेलिब्रेशनवरून वाद

IND A vs AUS A: प्रभसिमरनचं वादळी शतक, तर श्रेयस अय्यर-रियान परागचीही फिफ्टी! भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली ODI सिरीज

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

SCROLL FOR NEXT