Manikrao kokate esakal
नाशिक

टंचाई आढावा बैठकीत आमदार कोकाटेंचा अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर (जि.नाशिक) : दुष्काळ निवारणासाठी सिन्नर (Sinnar) तालुक्यात पाणी योजनांसाठी शासनाकडून कोट्यावधी रुपये खर्च होऊनही टॅंकरची गरज भासत असेल तर ते दुर्देव आहे. यापुढे नव्याने डिझाईन केलेल्या गावांचा ड्रॉ काढल्याशिवाय व त्यांना पूर्ण क्षमतेने पाणी न मिळाल्यास जीवन प्राधिकरण व ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या (Life Authority and Rural Water Supply Scheme) अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्या खिशातून वसुली केली जाईल असा इशारा इशारा आमदार माणिकराव कोकाटे (MLA Manikrao Kokate) यांनी दिला.

येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यमंदिरात तालुकास्तरीय टंचाई आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार कोकाटे यांच्यासह तहसीलदार (Tahsildar) राहुल कोताडे, जिल्हा परिषद (Zilla Parishad) सदस्य सीमंतिनी कोकाटे, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष विजय काटे, मनेगावसह १६ गाव पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे, राजाराम मुरकुटे उपस्थित होते.

तालुक्यातील जीवन प्राधिकरणच्या योजनांमध्ये अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे पाण्याच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण झालो असे म्हणता येणार नाही. जिल्हा परिषद दरवर्षी योजना राबवते व पुन्हा त्या बंद पडतात. यातून कायमस्वरुपी मार्ग काढून तालुक्यातील टंचाई दूर करण्यासाठी आपले प्रयत्न सुरु असल्याचे कोकाटे यांनी सांगितले. कोट्यवधीच्या योजना राबवूनही दरवर्षी टॅँकरची गरज भासणे म्हणजे कुठेतरी चुकते आहे, हे अधिकाऱ्यांच्या लक्षात यायला हवे. योजना राबवितांना ठेकेदार व अधिकाऱ्यांनी काळजी घेण्याची गरज कोकाटे यांनी व्यक्त केली.

आढावा बैठकीच्या प्रारंभी अटल भूजल योजनेचे समाज व्यवस्थापन तज्ज्ञ वसंत राठोड यांनी तालुक्यातील ७९ गावांचा या योजनेत समावेश केल्याची माहिती दिली. सिन्नर तालुक्यात राज्यातील सर्वाधिक गावांचा अटल भूजल योजनेत समावेश केल्याची ते म्हणाले. वडगाव-सिन्नर व पाटपिंप्री या दोन गावांचे टॅँकरचे प्रस्ताव पंचायत समितीकडे आल्याची माहिती मुरकुटे यांनी देऊन अद्याप कूपनलिकेला पाणी असल्याने या गावांना टॅँकर सुर करता येणार नसल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT