MLA Maulana Mufti Ismail asking him to answer after being stopped by a security guard at the municipal entrance esakal
नाशिक

Nashik News : मालेगाव महापालिका प्रवेशद्वारावर आमदारांना रोखले! कार्यकर्ते संतप्त

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव (जि. नाशिक) : शहरातील स्वच्छता ठेकेदार वॉटरग्रेसचे कर्मचारी बेमुदत धरणे आंदोलन करीत असल्याने शहरात जागोजागी कचऱ्याचे ढिगारे झाले आहेत. घंटागाडी आठवड्यापासून बंद असल्याने घरोघरी कचरा साचला आहे.

याबाबत वाढत्या तक्रारींसंदर्भात आयुक्तांना जाब विचारण्यासाठी आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल महापालिकेत जात असताना त्यांना महापालिकेच्या प्रवेशद्वार सुरक्षा रक्षकाने रोखले.

आमदारांना रोखल्याने त्यांच्यासमवेत आलेले कार्यकर्ते संतप्त झाले. या घटनेनंतर तत्काळ मनपाचे वरिष्ठ अधिकारी तातडीने प्रवेशद्वारावर आल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी सर्वांची माफी मागितल्याने वाद शमला. (MLA mufti ismaIl stopped at Malegaon Municipality entrance Activists are angry Nashik News)

शहरातील स्वच्छतेचा प्रश्‍न, अंदाजपत्रक, प्रलंबित कामे यासह विविध मुद्द्यांसंदर्भात तक्रारी करण्यासाठी आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल महापालिकेत जात होते. मुख्य प्रवेशद्वारावरच त्यांना सुरक्षा रक्षकाने रोखल्याने त्यांच्या समवेत असलेले कार्यकर्ते संतप्त झाले.

कार्यकर्ते सुरक्षा रक्षकांना जाब विचारत असताना झालेला गोंधळ ऐकून उपायुक्त राजू खैरनार, सहाय्यक आयुक्त सचिन महाले, शहर अभियंता कैलास बच्छाव तातडीने प्रवेशद्वारावर आले. त्यांनी सुरक्षा रक्षकाला माफी मागण्यास सांगितले.

तथापि कार्यकर्त्यांनी आमदारांना ओळखूनही जाणून बुजून रोखले असा आरोप केला. संबंधित सुरक्षा रक्षक आगामी काळात महानगरपालिका प्रवेशद्वारावर दिसता कामा नये अशी तंबी देवून हा वाद मिटविण्यात आला.

दरम्यान आयुक्त दोन आठवड्यापासून महानगरपालिकेत न आल्याबद्दल आमदार मौलाना मुफ्ती यांनी प्रसार माध्यमांकडे आयुक्तांवर टीका करत नाराजी व्यक्त केली.

शहरात स्वच्छतेचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला असताना आयुक्त नामनिराळे राहतात कसे ? खासगी ठेकेदार व कर्मचाऱ्यांमधील प्रश्‍न असला तरी शहरवासिय त्यात भरडले जात असल्याचे आमदार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs SA 1st Test: बाबर आझमचा अम्पायरने 'करेक्ट कार्यक्रम' केला! पाकिस्तानी चाहते खवळले; १० फलंदाज १६७ धावांत तंबूत परतले

Maharashtra Cabinet Meeting News: दिवाळीआधी पार पडली राज्य मंत्रिमंडळाची बैठक; फडणवीस सरकारने घेतले तीन महत्त्वाचे निर्णय

Weight Gain Foods: तुमचं वजन वाढवायचंय का? मग आहारात 'या' पदार्थांचा नक्की समावेश करा!

'सीता और गीता' साठी हेमामालिनी नाही तर 'या' अभिनेत्रीला झालेली विचारणा; नकार दिल्याचा आजही होतोय पश्चाताप

Latest Marathi News Live Update: सोलापुरात पत्नीचा पतीकडून खून; परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT