MLA Nitesh Rane Warns regarding Sane Guruji Sanstha nashik news 
नाशिक

Nitesh Rane: साने गुरुजी संस्थेला त्रास दिल्यास गाठ आमच्याशी; आमदार नीतेश राणे यांचा इशारा

साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ ही शिक्षणाचा ज्ञानयज्ञ चालवणारी संस्था आहे

सकाळ वृत्तसेवा

Nitesh Rane : साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ ही शिक्षणाचा ज्ञानयज्ञ चालवणारी संस्था आहे. काही विघ्नसंतोषी लोक या संस्थेला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. (MLA Nitesh Rane Warns regarding Sane Guruji Sanstha nashik news)

पण त्रास देणाऱ्यांनी गाठ आता आमच्याशी आहे, हे ध्यानात ठेवावे असा थेट इशारा आमदार नीतेश राणे यांनी दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून साने गुरुजी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना धमक्या देण्याचे काम सुरू असल्याकडे नीतेश राणे यांनी लक्ष वेधले.

नाशिक रोड येथील साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या ६२ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात गुरुवारी (ता.२१) ते बोलत होते. या वेळी नाशिक विभागाचे पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर, माजी महापौर अशोक दिवे, संस्थेचे अध्यक्ष प्रवीण जोशी, खजिनदार मिलिंद पांडे, सचिव अनिल अरिंगळे, विश्वस्त डॉ. भूषण कानवडे उपस्थित होते.

आमदार राणे पुढे म्हणाले, संस्थेसोबत माझ्याबरोबरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील असल्याने प्रत्येक अडचणीमध्ये तुमच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. साने गुरुजी शिक्षण संस्थेला दिला जाणारा सर्व त्रास आम्ही कायमचे संपवणार आहोत.

संस्थेविरोधात होणाऱ्या कारवाया, धमक्या, तक्रारी यासंबंधी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना भेटून खरी परिस्थिती कथन करणार असून संस्थेच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असल्याचेही ते म्हणाले. या वेळी बी. जी. शेखर यांनी साने गुरुजी संस्थेचा वटवृक्ष झालेला असून ज्ञानदानाचे पवित्र कार्य ते करीत असल्याने उत्तम संस्काराचा परिस स्पर्श लाभलेला असल्याचे मनोगत व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी शेवटचा..., बूटफेकीच्या घटनेनंतर काय म्हणाले सरन्यायाधीश? सुप्रीम कोर्टात काय घडलं?

Gautami Patil: अपघातावेळी गौतमी पाटील गाडीमध्ये होती का? पुणे पोलिसांनी तपासले शंभर सीसीटीव्ही

Rahul Dravid Son: ४८ ब्राऊंड्री अन् ४५९ धावा... द्रविडच्या धाकट्या लेकाच्या कारनामा; KSCA कडून झाला मोठा सन्मान

पालघरमधील तीन नगराध्यक्षांचे आरक्षण जाहीर! डहाणूत सामान्य, जव्हारमध्ये सर्वसाधारण महिला तर पालघरमध्ये ओबीसीचे आरक्षण

विनोद खन्नांचा मृत्यू कसा झालेला माहितीये? ६ वर्ष जगापासून लपवलेलं ते सत्य; एकटेच कुढत काढलेले दिवस, अखेर...

SCROLL FOR NEXT