MLA Satyajit Tambe giving a statement to Deputy Chief Minister Devendra Fadnavis. esakal
नाशिक

Nashik Pune Railway : पुणे-नाशिक रेल्वे शिर्डीमार्गे नको : आमदार सत्यजित तांबे

Nashik Pune Railway : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाच्या मूळ आराखड्यात बदल करत हा मार्ग संगमनेर तालुक्याऐवजी शिर्डीकडे वळविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Pune Railway : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाच्या मूळ आराखड्यात बदल करत हा मार्ग संगमनेर तालुक्याऐवजी शिर्डीकडे वळविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे संगमनेरकरांमध्ये प्रचंड नाराजी असून आमदार सत्यजित तांबे यांनी याच असंतोषाला वाचा फोडली आहे. मूळ आराखड्यानुसार हा मार्ग संगमनेर तालुक्यातून जाणे अपेक्षित असताना ऐनवेळी हा बदल का केला, असा प्रश्न उपस्थित करत आमदार तांबे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

रेल्वेमार्गाच्या मूळ आराखड्यात कोणताही बदल न करता तो संगमनेरमधूनच न्यावा, अशी आग्रही मागणी करणारे पत्र त्यांनी दिले. पुणे-नाशिक या दोन महानगरांना जोडणारा रेल्वेमार्ग महारेलच्या माध्यमातून उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. हा मार्ग संगमनेर तालुक्यातून जाण्याचे नियोजन झाले आहे.

या रेल्वेमार्गामुळे पुण्यातील चाकण, भोसरी आणि नाशिक जिल्ह्यातील सिन्नर आणि मुसळगाव या चार औद्योगिक वसाहती जोडल्या जाणार आहेत. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी अधिक प्रमाणात उपलब्ध होणार आहे. संगमनेरमधील फळे, भाजीपाला, धान्य हा माल थेट महानगरांमध्ये अधिक जलद पोचणार आहे.

तब्बल तीन दशकांनी संगमनेर देशाच्या रेल्वेच्या नकाशावर येणार असल्याचे आमदार तांबे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिले. राज्य सरकारने महारेलच्या माध्यमातून सिन्नर व संगमनेर तालुक्यात भूसंपादनही केले आहे. एकट्या संगमनेरमधून १०३ खरेदीखतांद्वारे थेट शेतकऱ्यांकडून जमिनी खरेदी केल्या.

असे असताना अचानक या मार्गात बदल करत तो संगमनेरऐवजी राजगुरू नगरवरून थेट शिर्डीकडे वळविण्याचा निर्णय का घेतला, याबाबतही तांबे यांनी उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. आमच्या भागासाठी हा महत्त्वाचा रेल्वेमार्ग आहे. त्यामुळे मूळ आराखड्यात बदल न करता हा मार्ग संगमनेरवरूनच न्यावा, अशी मागणी आ. तांबे यांनी केली आहे.

बदल कोणाच्या सूचनेनुसार?

ज्या मार्गासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात २ हजार ४२४ कोटी रुपयांची तरतूद झाली आहे. ज्या मार्गासाठी एकट्या संगमनेर तालुक्यातील १०३ शेतजमिनी खरेदीखत देत ताब्यात घेतल्या, तो मार्ग ऐनवेळी शिर्डीमार्गे वळविण्याचा निर्णय राज्य सरकारने कोणाच्या सूचनेनुसार घेतला, असा प्रश्नही आ. तांबे यांनी उपस्थित केला. मूळ आराखडा बदलून अचानक एखादा रेल्वे प्रकल्प दुसऱ्या मार्गाने वळवणे सोपे असते का, याबाबतचा शक्यता अहवाल तपासण्यात आला का, असे अनेक प्रश्न आ. तांबे यांनी उपस्थित केले. (latest marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

Nagpur Crime : अपघाताच्या विम्याच्या कागदपत्रासाठी मागितले आठ हजार; उपनिरीक्षक, हेडकॉन्स्टेबल एसीबीचा जाळ्यात

Shital Mahajan : स्पेनमध्ये स्कायडायव्हिंग करून शीतल महाजन यांच्या पंतप्रधानांना शुभेच्छा

INDW vs AUSW: टीम इंडियाच्या नारी शक्तीचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाचा वन डे क्रिकेट इतिहासात असा पराभव कुणी केलाच नव्हता...

Archana Kute: 'ज्ञानराधा मल्टिस्टेट'च्या अर्चना कुटेंना पुण्यातून अटक; छाप्यात काय-काय सापडलं?

SCROLL FOR NEXT