devyani 1.jpg 
नाशिक

हे आमदार म्हणतात.. "आम्ही कोरोनाला हरविणारचं..!"  

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरात मेपर्यंत नियंत्रणात असलेल्या कोरोनाने जून, जुलैमध्ये उग्र रूप धारण करत आता संपूर्ण शहर कवेत घेतल्याने प्रत्येकाच्या मनात भीती निर्माण झाली; परंतु कोरोनाशी दोन हात करताना प्रशासनावर अवलंबून राहता येणार नाही ही बाब लोकप्रतिनिधींना मान्य असल्याने नाशिक शहर कोरोनामुक्त करण्यासाठी आमदार सरसावले आहेत. मध्यच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी भाजपच्या नगरसेवकांची स्वतंत्र बैठक घेऊन त्यांच्या प्रभागात नागरिकांचे स्क्रीनिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वचे आमदार ॲड. राहुल ढिकले हेदेखील मैदानात उतरून थेट नागरिकांना स्वॅब टेस्टिंगचे आवाहन करणार आहेत. पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांनी सिडको, सातपूर विभागातील प्रत्येकाची रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. 


आमदार म्हणाले... 
महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने सर्वाधिक नगरसेवक आहेत. त्यामुळे ६५ नगरसेवकांची तातडीने बैठक घेऊन त्यांच्या प्रभागातील घराघरांमध्ये जाऊन तपासणी करण्याचे आवाहन करणार आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढविणारे औषधवाटप, प्रत्येक प्रभागातील टप्पा अन् टप्पा सॅनिटायझेशन करणे, नागरिकांना मास्क लावणे व गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यासाठी नगरसेवकांना प्रवृत्त करणार आहे. माजी नगरसेवकांनादेखील कोरोना बचावाच्या मोहिमेत सहभागी करून घेणार आहे. -प्रा. देवयानी फरांदे, आमदार, मध्य नाशिक 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना प्रत्येकाची टेस्ट होणे गरजेचे आहे. त्यामुळे फुलेनगर व पंचवटीतील झोपडपट्टी भागात फिरून नागरिकांना स्वॅब टेस्टिंगचे आवाहन केले; परंतु आता रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट वाढविण्यासाठी घराघरांत जाणार आहे. नागरिकांमधील भीती दूर करणे गरजेचे असल्याने जनजागृतीच्या माध्यमातून भीती दूर करू. यापूर्वी टेस्टिंग लॅबसाठी आमदार निधीतून २५ लाख रुपये दिले आहेत. आणखी निधी देण्याची तयारी आहे. -ॲड. राहुल ढिकले, आमदार, नाशिक पूर्व 

हेही वाचा > थरारक! बायकोच्या चारित्र्यावर होता नवऱ्याला संशय...मध्यरात्रीच केला 'असा' अंगावर काटा आणणारा प्रकार

सिडको, सातपूर हा दाट लोकवस्तीचा भाग असल्याने कोरोनाने सुरवातीला या भागाला कवेत घेतले. आता संपूर्ण शहर कोरोनाबाधित होण्याच्या वाटेवर असल्याने आमदार म्हणून मैदानात उतरणार आहे. घराघरात सॅनिटायझेशन करण्याबरोबरच स्वॅब टेस्टिंग अथवा रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट केली जाणार आहे. आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी आमदार निधी देऊ. -सीमा हिरे, आमदार, पश्चिम विधानसभा मतदारसंघ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT