Encroachment by ongoing construction on Camp Road
Encroachment by ongoing construction on Camp Road esakal
नाशिक

malegaon : कॉलन्यांतील रस्त्यावर अनधिकृत बांधकामे? MMCची डोळेझाक

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : शहराचा विस्तार दूरवर होत आहे. महापालिका हद्दवाढ होऊन तब्बल बारा वर्षे झाली. शहरालगतची गावे महापालिकेत समाविष्ट झाली. विशेष म्हणजे यामध्ये शहरातील सोयगाव, दरेगाव, कलेक्टरपट्टा हा भाग मोठ्या प्रमाणावर विस्तारलेला आहे. नव्या वसाहती वाढल्या. बांधकामे मोठ्या प्रमाणात झाली.

अतिक्रमणांच्या विळख्यात अनेक कॉलन्यांतील आधीच छोटे असलेले रस्ते अनधिकृत बांधकामांमुळे अधिक रूंद झाल्याने नागरिकांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो. या सर्व प्रकाराकडे महापालिकेच्या बांधकाम विभागाची सपशेल डोळेझाक आहे. नियमित कर भरणाऱ्या नागरिकांनाच दबंगगिरी करणाऱ्या रहिवाशांची अरेरावी सहन करावी लागते. (MMC Ignores Unauthorized constructions on roads in colonies malegaon news)

या सर्व प्रकारास महापालिकेचे लेचेपेचे धोरण कारणीभूत असल्याचे निदर्शनास येते. सोयगाव भागातील नव्याने आठ- दहा वर्षात अनेक कॉलन्या विकसित झाल्या. काही ठिकाणी जेमतेम रस्ते पोहचले. कसेबसे खडीकरण झालेल्या रस्त्यांची सुविधा झाली. अनेकांनी स्वतःचे बांधकाम पूर्ण करून रस्त्यावर चार ते पाच फुट जागा बळकावत अनधिकृत ओटे बांधले आहेत.

आजुबाजूच्या रहिवाशांनी ओरड केल्यास ‘दादागिरी’ करून आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो. अशा अतिक्रमणांमुळे आपापसात कुरापती वाढून अंतर्गत वातावरण खराब होत असते. अनेक रहिवासी यासंबंधी महापालिका प्रशासनाकडे तक्रार करतात. पण, या तक्रारींची फारशी दखल होत नसल्याने गप्प बसून अन्याय सहन करतात.

हद्दवाढ झालेल्या सोयगाव भागातील संभाजी नगर, एकनाथ नगर, प्रेरणा सोसायटी, प्रज्ञा कॉलनी, गोविंद नगर, जिजाऊ नगर, भगवती कॉलनी, राधाकृष्ण कॉलनीसह आसपासच्या परिसरातील अंतर्गत रस्ते, एकमेकांच्या बांधकामाचे अतिक्रमण निर्मूलन व नगररचना विभागाने तातडीने काढावे, अशी मागणी होत आहे.

'हद्दवाढ झालेल्या भागात बारा वर्षांनंतरही सुविधा पोहचलेल्या नाही. तोकड्या सुविधा, कॉलनीतील अतिक्रमण व वाढीव बांधकामामुळे नागरिक त्रस्त आहेत. याकडे महापालिका प्रशासनाने लक्ष घालून बांधकाम परवानगीपलिकडे असलेली वाढीव कामे, रस्त्यावरील अतिक्रमण यावर कारवाई करावी.' - दिनेश ठाकरे, सचिव, प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस

'शहरातील अनेक भागात अनधिकृत बांधकामे वाढली आहेत. याकडे महापालिकेचे पुर्णतः दुर्लक्ष झाले आहे. कॉलनीअंतर्गत रस्तेही अतिक्रमणांच्या विळख्यातून सुटलेले नाही. अशा अनधिकृत बांधकामे व मालमत्ता धारकांवर कारवाई करण्याची गरज आहे.'

- डॉ. दीपक पाटील, मालेगाव कॅम्प

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT