mns google
नाशिक

नाशिकमध्ये मनसेच्या माजी जिल्हाध्यक्षांचं अकाली निधन

आज सकाळी अचानक त्यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचा मृत्यू झाला.

सकाळ डिजिटल टीम

आज सकाळी अचानक त्यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचा मृत्यू झाला.

मागील काही दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे नाव चांगलेचं चर्चेत आले आहे. राजकीय वर्तुळात केलेल्या काही वक्तव्यांमुळे त्यांच्यावर टीका होत आहे. दरम्यान, आता मनसे संदर्भातील एक बातमी समोर येत आहे. नाशिक (Nashik) येथील मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष अनंता सूर्यवंशी यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. आज सकाळी अचानक त्यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचा मृत्यू झाला. ते ४८ वर्षांचे होते. त्यांच्या अशा अकाली निधनानं संपूर्ण राजकीय क्षेत्रात आणि मनसेमध्ये शोककळा पसरली आहे. (MNS anant suryavanshi)

मिळालेल्या माहिती अशी, सुर्यवंशी हे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेले. तिथून परतल्यानंतर त्यांनी स्विमिंग केलं आणि पूलमधून बाहेर येताच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. ही बाब इतरांच्या लक्षात येताच सूर्यवंशी यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. सूर्यवंशी यांच्या जाण्यामुळे मनसेतला एक सच्चा नेता हरवला अशी प्रतिक्रिया येत आहे. कमी बोलणारे पण सतत पक्षासाठी काम करणारे निष्ठावान नेते अशी त्यांची ओळख होती. त्यामुळे सूर्यवंशी यांच्या अशा जाण्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

दरम्यान, अनंता सूर्यवंशी हे मनसेच्या स्थापनेपासूनच पक्षात सदैव कार्यरत होते. ते राज ठाकरे यांचे अतिशय जवळचे नेते होते. सूर्यवंशी यांनी पंचवटी परिसरातून नगरसेवक पददेखील भूषवलं होतं. ग्रामीण भागात तब्बल ५ वर्ष ते मनसेचे जिल्हाध्यक्ष होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT