Chain Snatching Crime esakal
नाशिक

Nashik Crime News : मालेगावात चैन स्नॅचिंगचे प्रकार वाढले; बाईकस्वार चोरट्यांचा सुळसुळाट

राजेंद्र दिघे

मालेगाव (जि. नाशिक) : शहरात सध्या मोबाईल स्नॅचिंगच्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांच्या जीविताला या माध्यमातून धोका निर्माण झाला आहे. शहरातील मुख्य रस्त्यासह अनेक निर्मनुष्य रस्ते, अंतर्गत कॉलन्यात बाईक स्वार मोबाईल चोरट्यांचे ठिकाण बनले आहे. (mobile Chain snatching increased in Malegaon Nashik Latest Crime News)

दैनंदिन सायंकाळी पायी फिरणाऱ्यांचे शर्टच्या वरच्या खिशातून मोबाईल चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. आता तर चक्क हातातील मोबाईल हिसकावून बाईकवर पळ काढत असल्याचे प्रकार घडत आहेत. परिणामी, आरोग्यदायी सायंकाळी फिरायला जाणाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. शहरातील पोलिसांनी सायंकाळची पेट्रोलिंग करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

चाळीसगाव फाटा परिसर, मनमाड चौफुली, महामार्ग, शहरातील सोमवार बाजार, दौलती इंग्लिश स्कूल, दाभाडी रोड, नामपूर रोड, मन्सुरा ते शालीमार चंदनपुरी या रस्त्यात भरधाव वेगात येऊन आपले कसब दाखवून क्षणार्धात मोबाईल वरचेवर चोरून नेले जात आहे.

चैन स्नॅचिंगचे प्रकार संपत नसताना मोबाईल चोरीचे नवे प्रकरणे पोलिस यंत्रणेपुढे आव्हानात्मक ठरत आहे. सर्वसाधारण नागरिकांची मोबाईल दैनंदिन गरज झाली हे ओळखून चोरीला गेलेल्या मोबाईल नंतर त्यावर पाठपुरावा न करता नवीन मोबाईल घेतात. मात्र चोरीबाबत ऑनलाइन व प्रत्यक्ष तक्रारीवरून आजपर्यंत किती मोबाईल ट्रॅक झाले हा पोलिस यंत्रणेपुढील यक्ष प्रश्न आहे.

मोठ्या प्रमाणावर मोबाईल हातातून, चालत्या बाईक वरून हिसकावून चोरी होत आहेत. मात्र पोलिस स्टेशनचा ससेमिरा टाळत नवीन कार्ड घेऊन तक्रार नोंदवण्यास फारशा प्रमाणात पुढे येत नाही. गुन्ह्यांच्या तपासाला गती मिळण्यासाठी शहरातील मुख्य चौकांत व रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा प्रस्ताव महापालिकेस देण्यात आला आहे. गुन्हे उघडकीस आणण्यासाठी नागरिकांची मदत, सहकार्याबरोबरच सीसीटीव्हीची गरज आहे.

नागरिकांच्या अपेक्षा :

-मुख्य चौकात व मुख्य रस्त्यावर सीसीटीव्ही बसविण्यात यावेत.

-पोलिसांनी सायंकाळच्या काळात पेट्रोलिंग करण्याची गरज आहे.

-शहरातील निर्मनुष्य असलेल्या रस्त्यावर अधूनमधून दक्षता पथकाचे राउंड करावे.

-मोबाईल स्नॅचिंगनंतर पोलिसांनी आलेल्या तक्रारींची दखल घेऊन तातडीने ट्रॅक करण्यासाठी प्रयत्न करावे.

"नागरिकांनी भीती न बाळगता आपला मोबाईल सुरक्षित ठेवावा. वरच्या खिशात ठेवणे, रस्त्यावर फोनवर बोलणे टाळावे. आसपासच्या परिसरात तोंडावर रुमाल बांधलेल्या व्यक्तींपासून सावधानता बाळगावी, संशयास्पद वाटल्यास नागरिकांनी पोलिसांना कळवावे. सीसीटीव्ही कॅमेरे ही मुख्य बाब असून या आधारावर पोलिस यंत्रणा सतर्कतेने संशयिताचा शोध घेऊ शकते."

- तेगबीरसींग संधू, पोलिस उपअधीक्षक, मालेगाव शहर

"ॲण्ड्रॉइड मोबाईलमध्ये ॲण्टी सेफ्टी सिस्टीमचा वापर करून ठेवावा. जेणेकरून मोबाईल चोरी झाल्यास त्याचा गैरवापर होणार नाही. पोलिस स्टेशनला तक्रार दिल्याने मोबाईल डाटा गैरवापर केल्यास आपण अडचणीत येत नाही. स्वस्त मिळाला म्हणून जुने अथवा चोरीचे विक्री होणारे मोबाईल खरेदी बंद करावी. गोपनीयदृष्ट्या ॲप्लिकेशन सक्रिय असावेत, योग्य लॉक सुविधांचा वापर करावा." - पुष्पक निकम, नागरिक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Nagar Parishad Election : बारामतीत जय पवार यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्याची मागणी......

Train food vendor beat passenger Video : ‘’जेवण फार महाग आहे’’, एवढंच म्हटलं तर प्रवाशाला रेल्वेतच विक्रेत्यांनी पट्टा काढून बेदम मारलं!

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने सर जे. जे. समूह रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना नोटीस बजावली

पिंम्पल्स असलेली हिरोईन आम्ही का पाहायची... शिवानीला झालेल्या ट्रोलिंगवर अमित म्हणतो- तिच्या चेहऱ्यावर लिच लावले...

Tomorrow Horoscope Prediction : उद्या तयार होतोय अत्यंत शुभ सर्वार्थ सिद्धी योग, 5 राशींवर भगवान विष्णूची कृपा

SCROLL FOR NEXT