Nashik Crime Mobile Theft News esakal
नाशिक

Nashik Crime News: ऐकाव ते नवलचं! चक्क मोबाईल चोराने दिल नवीन फोन घरी आणून देण्याच आश्वासन

सकाळ वृत्तसेवा

Nashik News: दीदी मला माफ कर, पण माझ्याकडे पैसे आल्यावर तुला नवीन मोबाईल घेऊन देईल, तूर्त माझा पिच्छा सोड, अशी विनवणी मोबाईल लांबविणाऱ्या संशयिताने संबंधित तरुणीला पोलिसांसमोर केली. याची चर्चा संबंधित पोलिस स्टेशनसह सोशल मीडियावर रंगली आहे.

पंचवटीतील एक विवाहित तरुणी एका खासगी रूग्णालयात गेल्या अनेक वर्षापासून परिचारिका म्हणून कार्यरत आहे. जुना मोबाईल खराब झाल्याने मध्यंतरी या तरुणीने नवीन मोबाईल विकत घेतला.

शुक्रवारी (ता.२४) ती मोबाईलवरून बोलत शालिमार परिसरातून पायी जात होती. त्याचवेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी मागील सीटवर बसलेल्या चोरट्याने तिच्या हातातील मोबाईल हातोहात लांबविला.

त्यानंतर त्या तरुणीने मोबाईल लांबविल्याची तक्रार देण्यासाठी पोलिस ठाणे गाठले. त्यावेळी पोलिस ठाण्यातील ठाणे अंमलदाराने तरुणीला मोबाईल नंबर विचारून घेत स्वतःच्या मोबाईलवरून त्या क्रमांकावर संपर्क साधला.

मात्र रिंग वाजूनही पलीकडील व्यक्ती फोन उचलत नव्हती. संबंधित पोलिस कर्मचाऱ्याने तरुणीकडे फोन देत संशयिताला बोलण्याचे आवाहन केले. संशयिताने प्रतिसाद देत तरुणीशी संभाषण केले.

संशयिताची प्रांजल कबुली

मी गरीब घरातील असून एका रुग्णालयात काम करत असल्याचे तरुणीने संभाषणात सांगितले. तेव्हा पलीकडून क्षणाचाही विलंब न करता ‘ताई मला वीस हजार रुपयांची खूप गरज होती, त्यामुळे मोबाईल लांबविल्याची प्रांजल कबुलीही संबंधित तरुणीला दिली.

यावर तरुणीने संबंधिताला काहीतरी कामधंदा करून पैसे कमविण्याचा सल्ला दिला. मात्र तरुणाने शोधूनही नोकरी मिळत नसल्याने मोबाईल चोरीसारखे धाडसी पाऊल उचलावे लागल्याचे सांगितले.

एवढेच नव्हे तर आपण सराईत गुन्हेगार नाही, एवढ्यावरच न थांबता संबंधित तरुणीकडे तिच्या घरचा पत्ता विचारत पैसे आल्यावर नवीन मोबाईल घरी आणून देण्याचे आश्‍वासनही दिले.

या बाबत संबंधित पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्याने तरुणीला कारवाई करण्याचे आश्वासन दिले. या घटनेने वाढती बेकारी व त्याअनुषंगाने समाजातील वाढती गुन्हेगारी, चोरट्यांची मानसिकता यावर प्रकाशझोत टाकला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : अवजड वाहनांमुळे रस्ते बनले मृत्यूचे सापळे; पुण्यात अडीच वर्षांत २१४ जणांचा मृत्यू, १९२ गंभीर जखमी

भरणीतील चिठ्ठ्यांमधून निघणार OBC आरक्षण! सोलापूर जिल्ह्यात मंगळवारी सरपंचपदासाठी आरक्षण सोडत, जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या ‘या’ सूचना

Shravan Upvas Benefits: या श्रावणात ‘उपवास’ ठरेल आरोग्यासाठी वरदान! कारणे, फायदे व महत्त्व समजून घ्या

Beed News: अल्पवयीन पंधरा मुलांची थेट विक्रीच; गहूखेलमधील प्रकरणात बालसंरक्षण अधिकाऱ्यांची पोलिसांना माहिती

Pune Traffic : चाकण-भोसरी कोंडीबाबत स्वतंत्र बैठक, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; गृहनिर्माण सोसायटी पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट

SCROLL FOR NEXT