Mobile Phone News esakal
नाशिक

Nashik News : अंगणवाडी सेविकांना पुन्हा देणार मोबाईल?

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : अंगणवाडीचे काम ऑनलाइन करण्यासाठी प्रत्येक सेविकांना ऑनलाइन माहिती भरण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाकडून पुन्हा नवीन मोबाईल देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी विभागाने दोन वर्षांपूर्वी मिळालेल्या मोबाईलची सद्यःस्थिती काय आहे, याविषयीची माहिती मागवली आहे. या संदर्भात राज्य स्तरावरून निर्णय घेतला जाणार आहे.

सर्व अंगणवाड्यांचे काम ऑनलाइन पद्धतीने करण्याचा राज्य सरकारने दोन वर्षापूर्वी घेतला घेतला होता. अंगणवाडीचे काम ऑनलाइन करण्यासाठी प्रत्येक सेविकांना मोबाइल देण्यात आले होते. याकरिता अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देखील देण्यात आले होते.

हेही वाचा : असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

प्रत्येक सेविकेला मोबाइलमध्ये कॉमन अॅप्लिकेशन सॉफ्टवेअर (कास) या अ‍ॅपद्वारे माहिती भरली जात होती. मात्र, मिळालेले मोबाईल निकृष्ट दर्जाचे असल्याचे सांगत या अंगणवाडी सेविकांनी मध्यंतरी आंदोलन करत मोबाईल शासनाकडे परत करण्याचा निर्णय घेतला होता. आता या सेविकांना नवीन मोबाईल देण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यादृष्टीने त्यांनी जिल्हास्तरावरील माहिती मागवली आहे. जिल्ह्यात 4 हजार 776 अंगणवाड्या तर 506 मिनी अंगणवाड्या आहेत. येथील साधारणत: 5 हजार 200 अंगणवाडी सेविकांना मोबाईलची आवश्यकता भासते. महिला व बालकल्याण विभागामार्फत चालवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती ‘पोषण ट्रॅकर’ या अ‍ॅपद्वारे ऑनलाइन भरावी लागते.

त्यासाठी अंगणवाडी सेविकांना मोबाईलची आवश्यकता आहे. अंगणवाडीतील पूरक पोषण आहार, औषधांचे वाटप, बालकांच्या वजन, उंचीच्या नोंदी, लसीकरण आदींच्या नोंदी घेण्यात येतात. मोबाईल मिळाल्यास अंगणवाडी सेविकांना रजिस्टर हाताने लिहिण्याची गरज राहणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

SCROLL FOR NEXT