Mobile phones seized from Jalgaon district by the police here. Staff including Assistant Police Inspector Kiran Patil, Ujwal Singh Rajput etc. esakal
नाशिक

Nashik Crime News : सटाणा येथून चोरी झालेले मोबाईल जळगावातून हस्तगत

लखमापूर (ता. बागलाण) येथे एप्रिल महिन्यात मध्यरात्री मोबाइलचे दुकान फोडून चोरट्यांनी जवळपास दीड लाखांचे मोबाइल व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू चोरून त्यांची परस्पर विक्री केली होती.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : लखमापूर (ता. बागलाण) येथे एप्रिल महिन्यात मध्यरात्री मोबाइलचे दुकान फोडून चोरट्यांनी जवळपास दीड लाखांचे मोबाइल व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू चोरून त्यांची परस्पर विक्री केली होती.

सटाणा पोलिसांना विक्री झालेले सर्व मोबाईल जळगाव जिल्ह्यातून हस्तगत करण्यात यश आले आहे.(Mobile stolen from Satana recovered from Jalgaon nashik crime news)

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लखमापूर येथील शाहु इलेक्ट्रॉनिक दुकान, त्याच्या शेजारील किराणा दुकान व कापड दुकान मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी फोडले होते. चोरट्यांनी छतावरील पत्रे उचकटून दुकानात प्रवेश करताना जवळपास दीड लाख रुपयांचे मोबाईल फोन व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू चोरून पोबारा केला होता.

दुकानमालक भाऊसाहेब दादाजी हांडे यांनी यासंदर्भात सटाणा पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल केला होता. पोलिस उपअधीक्षक पुष्कराज सूर्यवंशी, पोलिस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली सटाणा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवली.

चोरट्यांनी चोरी केलेले मोबाईल फोन जळगाव जिल्हय़ातील धरणगाव, चोपडा, शिरपूर तालुक्यात विक्री केल्याचे श्री. पाटील यांच्या तपासात निष्पन्न झाले. तेथून सहाय्यक पोलिस निरीक्षक पाटील यांनी सर्व मोबाईल फोन हस्तगत केले.

तपास कामी सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण पाटील, हवालदार योगेंद्र शिसोदे, पोलिस कर्मचारी सिकंदर कोळी यांनी विशेष परिश्रम घेतले. या कारवाईबद्दल जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, अप्पर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांनी सटाणा पोलिसांचे अभिनंदन केले आहे.

''या गुन्ह्यातील आरोपीच्या आम्ही मागावर आहोत. यामागे मोठी टोळी कार्यरत असण्याची शक्यता आहे. लवकरच त्यांना गजाआड केले जाईल. यामुळे सटाणा शहर व तालुक्यातील घरफोड्यांचा सुद्धा उलगडा होण्याची शक्यता आहे.''- किरण पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT