Two people caught in the waiting room. esakal
नाशिक

रेल्वे स्टेशनवर बॉम्ब अन् प्रवाशांची बोंबाबोंब! मनमाडला Mockdrill, तब्बल सव्वातास धुमश्चक्री

सकाळ वृत्तसेवा

मनमाड (जि. नाशिक) : सकाळी साडेदहाची वेळ... मनमाड रेल्वे स्थानकावर एकच धावपळ उडाली.... रेल्वे स्टेशनवर बॉम्ब आणि एकच गदारोळ उडाला. बॉम्ब असल्याचा संदेश मिळताच रेल्वेची आपत्कालीन यंत्रणा सरसावली.

दुसरीकडे शहरामध्ये रेल्वे स्थानकावर बॉम्ब असल्याची बातमी कळताच मनमाडकरांनी रेल्वे स्टेशनकडे धाव घेतली. अखेर हा बॉम्ब नसून रेल्वे स्थानकावर दहशतवादी हल्ल्याच्या अनुषंगाने प्रशासनाची तत्परता पाहण्यासाठी सराव (मोकड्रील) असल्याचे समजल्यावर रेल्वे स्थानकावरील प्रवाशांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला. (Mockdrill of Railway station bomb at manmad nashik news)

रेल्वे स्थानकावर सापडलेली बॅग

रेल्वे स्थानकावर अघटित घटना घडल्यास पोलिसांकडून किती कालावधीत प्रतिसाद दिला जातो, संरक्षण सज्जता कशी आहे, हे पडताळण्यासाठी आज रेल्वे स्टेशन परिसरात मॉकड्रील घेण्यात आली. सकाळी मॉकड्रीलला सुरवात झाली.

तिकीट बुकिंग ऑफिसच्या समोर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम समोर एक निळ्या कलरची ओलीस ठेवलेली बॅग पडलेली असून त्यात बॉम्बसदृश्य वस्तू अशी माहिती मिळाली.

रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सदर परिसर तातडीने खाली करण्यात आला. नाशिक येथील बॉम्ब शोधक पथक, एटीस पथक, क्युटीआर पथक आणि अग्निशामक दल, श्वान पथक, शहर पोलिसांसह पोलिस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा रेल्वे स्टेशनला पोहोचला.

हेही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

सकाळी ११.३० वाजता रेल्वे स्थानकावर एवढा मोठा फौजफाटा पाहून प्रवासी देखील अचंबित झाले. दरम्यान, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी संशयित बॅग पडलेला परिसर तातडीने निर्मनुष्य केला. नंतर बॉम्ब शोधक पथकाने खबरदारी घेत बॅगेचे अ‍ॅन्टी हँडलिंग करत आरओव्ही पद्धतीने ती निकामी केली.

तब्बल सव्वातास चाललेल्या धुमश्चक्रीनंतर वेटिंग रूममध्ये लपून बसलेल्या दोघांना पकडण्यात जवानांना यश आले. दहशतवादी हल्ल्याच्या अनुषंगाने प्रशासनाची तत्परता पाहण्यासाठी रेल्वे सुरक्षा यंत्रणेची ही रंगीत तालीम होती. हे दृश्य पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला होता.

रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक शिरीष देंगे, प्रभारी लोहमार्ग पोलिस निरीक्षक एस. एस. वाघमोडे, श्वान पथकातील श्वान दारा व गोल्डीचे हँडलर गणेश भोसले, देवेंद्र कुंभार, हेड कॉन्स्टेबल दीपक पिंपळसे, नारायण शिरसाठ, अग्निशामक दलातील कर्मचारी आदींसह ४५ हून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT