money will be deposited by government in account of Anganwadi sevika mini sevika and helper nashik news esakal
नाशिक

Nashik News : अंगणवाडीसेविका, मदतनीस यांना 2 हजार रुपये भाऊबीज; सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडीसेविकांना फायदा

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : अंगणवाडीसेविका, मदतनीस यांना दोन हजार रुपयांची भाऊबीज राज्य शासनाने जाहीर केली आहे. त्याबाबतचा शासन आदेश निघाला असून, लवकरच अंगणवाडीसेविका, मिनीसेविका, तसेच मदतनीस यांच्या खात्यावर शासनाकडून पैसे जमा होणार आहेत.

जिल्ह्यातील दहा हजार अंगणवाडीसेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडीसेविका यांना फायदा होणार आहे. (money will be deposited by government in account of Anganwadi sevika mini sevika and helper nashik news)

शून्य ते सहा वर्षे वयोगटांतील बालकांचे पोषण, स्तनदा माता, गरोदर महिलांना घरपोच पोषण आहार देणे, त्यांना मार्गदर्शन करणे, शासन व जिल्हा परिषदेच्या विविध योजना व उपक्रम राबविण्यात अंगणवाडीसेविकांचा मोठा सहभाग असतो. जिल्ह्यातील अंगणवाडीसेविका, अंगणवाडी मदतनीस व मिनी अंगणवाडीसेविकांना प्रत्येकी दोन हजार रुपयांची भाऊबीज मिळणार आहे.

दरम्यान, दिवाळीत भाऊबीज मिळावी, या संदर्भात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शासनाकडे मागणी केली होती. त्यानुसार शासनाने एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता कार्यरत अंगणवाडीसेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडीसेविका या मानधनावरील कर्मचाऱ्यांना भाऊबीज भेट जाहीर केली आहे.

दर वर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीची भाऊबीज अंगणवाडी मदतनीस, सेविकांच्या खात्यावर जमा होणार आहे. त्या संदर्भातील कार्यवाही जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून करण्यात येते. एकाच दिवशी सर्वांना समान पद्धतीने भाऊबीजची रक्कम मिळणार आहे.

जिल्ह्यातील चित्र

अंगणवाडीसेविका = ४ हजार ६०९

मदतनीस = ४ हजार ६०९

मिनी अंगणवाड्या = ७७८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT