monkey mother.png
monkey mother.png 
नाशिक

VIDEO : वेडी मायाच तिची! ज्या बाळाला उराशी लावून 'ती' फिरतेय..तो मृत असल्याचेही "तिला' नाही भान.

दिगंबर पाटोळे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक / वणी : असे म्हटले जाते जगात सर्वश्रेष्ठ प्रेम हे आईचे असते. आत्मा व ईश्वराचा संगम म्हणजे आई असते. आईची वेडी माया ती मनुष्य जातीतील असो किंवा प्राणी जातीतील.. याचा प्रत्यय युगानुयुगे सर्वांनी घेतला आहे व अनुभवतो आहे. अशीच एक मन हेलावून टाकणारी घटना सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थांना बघावयास मिळत आहे.

शेवटी आईच ती..

नांदुरी - सप्तशृंगी गड मार्गावरील रत्नगड (सेल्फी पाईंट) वर गेल्या दहा बारा दिवसांपासून आपल्या मृत पिल्लास माकडीण घेवून फिरते आहे. माकडीणीच्या पिल्लाचा आजाराने किंवा अपघाताने मृत्यु झाला असावा, मात्र ही माकडीण आपल्या मृत पिल्लास या परीसरात घेवून फिरत आहे. त्याच्या मृतदेहाला खाऊ घालण्याचा, पाणी पाजण्याचा प्रयत्न करते.. त्याच्या बरोबर खेळण्याचा व आपल्या अंगावर घेऊन झोपते व इकडे तिकडे उडयाही मारते. त्या पिलाचे निर्जीव शरीर आहे, त्या मृतदेहाची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. ते मृत शरीर काळे ठिक्करही पडले आहे व त्याचा दुर्गंधही येऊ लागला आहे. तरीही माकडीन आपल्या पिलास न सोडता या झाडावरुन त्या झाडावरुन घेवून फिरत आहे. 

शेकडो माकडांचाही उदरनिर्वाहाचा प्रश्न

१७ मार्च पासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सप्तशृंगी मातेचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद आहे. पर्यायाने गडावरील सर्व व्यवसाय, हॉटेल्स देखील बंद आहे.  सप्तशृंग गडाचे प्रमुख आकर्षण असलेल्या शेकडो माकडांचाही उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होवू लागल्याने सप्तशृंगी गडावरील इम्रान शेख, तुषार बर्डे, सोमनाथ मानकर, राजू केवारे, भुषन माळी आदीं ग्रामस्थांबरोबरच सप्तशृंगी देवी ट्रस्ट, वनविभाग व ग्रामपंचायतीच्यावतीने मंदीर परीसर, सीतकडा, गणपती मंदीर (रडतोंडी) व अन्य ठिकाणी माकडांसाठी खाद्य व पाण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

माकडीणीकडून पिलास सोडवण्याचा प्रयत्न
आपल्या पिलाचा मृत्यु झाला तर माकडीन कधीकधी पिलाच्या मृतदेहाचा साफळा होईपर्यंतही सोडत नसते. याबाबत सदर माकडीणीकडून पिलास सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. माकडांची उपासमार होवू नयॆ म्हणून टॉमेटो, काेबी, भाजीपाला आदी खाद्य व पाण्याची व्यवस्था वनविभागाच्यावतीने करण्यात आली आहे. - अमृता पवार, वन कर्मचारी सप्तशृंगी गड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT