thar mahindra.jpg
thar mahindra.jpg 
नाशिक

महिंद्राच्या ‘थार’ला महिनाभराची वेटींग! शो रूममध्ये ग्राहकांच्या चकरा  

सतीश निकुंभ

नाशिक / सातपूर : लॉकडाऊन च्या संकटावर मात करत महिंद्राने ‘थार’ या नव्या मॉडेलचे लॉंचिंग करून ऑटोमोबाईल क्षेत्राबरोबर महिंद्राच्या ग्राहकांनाही भुरळ घातली आहे. मात्र, या गाडीसाठी ग्राहकांना ऐन दिवाळीत एक महिन्याच्या वेटिंगला थांबावे लागणार आहे. 

चाहत्यांसाठी नवीन गाडीचे आकर्षण
महिंद्रा समुहातील सर्वप्रकारे नवीन असलेली ‘थार’ ही महिंद्राची एसयूव्ही तंत्रज्ञान, आराम आणि सुरक्षितता या बाबतीत कित्येक पटींनी श्रेष्ठ आसल्याचा दावा कंपनीने केला आहे. कच्च्या रस्त्यावरून धावण्याची या गाडीची क्षमता आणि तिची विशिष्ट रचना या मूलभूत वैशिष्ट्याबाबत कोणतीही तडजोड करण्यात आलेली नाही. थारच्या पारपरिक चाहत्यांना ही नवीन गाडी आकर्षित करते. थार ही गाडी समृद्ध वारशाचा ध्वजवाहक आहे आणि महिंद्राच्या गुणसूत्रांची शुद्ध अभिव्यक्ती आहे. तिच्या नव्या अवतारात, वाहन चालनाचा आनंद परत मिळवणे हे उद्दिष्ट सामावलेले आहे.

नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रात सकारात्मक पाऊल

अन्य कोणत्याही वाहनामधून मिळू शकणार नाही, अशी प्रातिधिनिक रचना व वाहन चालनाचा आनंद यांचे अपवादात्मक मिश्रण यात पाहावयास व अनुभवावयास मिळणार आहे. या गाडीच्या निमित्ताने नाशिक प्रकल्पातील सर्व वरिष्ठ आधिकारी, कर्मचारी तसेच, कामगारही मोठ्या प्रमाणावर आशावादी आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर थार ही गाडी लॉंच करण्याचे धारिष्ठ्य दाखवून महिंद्राने कामगारांबरोबरच नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रात सकारात्मक पाऊल पुढे टाकल्याची भावना शेकडो वेन्डर व लघुउद्योजकांनी व्यक्त केली आहे. ज्या- ज्या वेळी नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रावर विविध संकट अथवा मंदीचे सावट आले, त्यावेळी महिंद्राने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत नविन सेगमेन्टमध्ये दमदार पाऊल टाकत, औद्योगिक मंदीच्या चक्रातुन बाहेर काढण्याचे मोलाचे कार्य केले आहे. आता कोरोनात थारचे आनावरण हे त्याचेच उदाहरण आहे. सध्या नाशिक प्रकल्पात गेल्या काही दिवसांपासून या गाडीचे उत्पादन युद्ध पातळीवर सुरू आहे. 

शो रूमकडून एक महिन्याची वेटींग

महिंद्राच्या ‘थार’ या नव्या अवतारात येणाऱ्या एसयूव्हीचे अनावरणाची, कंपनीने देशाच्या स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्टला घोषणा केली व २ ऑक्टोबरला या गाडीची अधिकृत बुकींग सुरू केली. सुरवातीच्या काही महिन्यांतच देशभरातुन हजारोच्या संख्येने ग्राहकांनी थार गाडीची बुकींग केली. आता दिवाळी आल्याने प्रत्येकालाच ही गाडी हवी आहे; पण शो रूमकडून एक महिण्याची वेटींग आसल्याचे सांगितले जात आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT