return home to a regional laborer.jpg 
नाशिक

...'तर नाशिकमध्येही वांद्रे सारखीच परिस्थिती'...परप्रांतीय मजुरांचा घराकडे परतण्याच्या अट्टहास!

सकाळवृत्तसेवा

नाशिक : दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व 21 दिवसांच्या लॉकडाउन संपण्याच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउन जाहीर करण्याची घोषणा झाल्यानंतर मुंबईतील वांद्रे रेल्वेस्थानकावर परप्रांतीय मजुरांची गर्दी होऊन पोलिसांना लाठीमार करण्याची वेळ आली. तशीच स्थिती नाशिकमध्येही उद्‌भवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

त्यांचा रोजगार देखील हिरावला

कोरोनाच्या संसर्गामुळे देशभरात लॉकडाउन वाढविण्यात आला आहे. 21 दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्याच्या चार दिवस आधीपासून महाराष्ट्रात लॉकडाउन झाला आहे. कारखाने, दुकाने सर्वच खासगी, सरकारी आस्थापना बंद असल्याने संपूर्ण व्यवहार ठप्प झाले आहेत. नाशिकमध्ये सातपूर व अंबड भागात छोट्या, मोठ्या कंपन्यांमध्ये रोजंदारीवर काम करणारे मजूर मोठ्या प्रमाणात आहेत. कारखाने बंद असल्याने त्यांचा रोजगार हिरावला गेला आहे. मुळात ते कामगार ठेकेदारामार्फत काम करत असल्याने कंपन्यांच्या मालकांचे त्यांना वेतन देण्याचे दायित्व राहत नाही. सातपूरच्या राजवाडा, महादेववाडी, स्वारबाबानगर, जगतापवाडी, सातपूर-अंबड लिंक रोडवर रोजंदारीवरचे कामगार मोठ्या प्रमाणात वास्तव्याला आहेत. त्यांच्याकडचे पैसे संपले आहेत. त्यांच्याकडे शिधापत्रिका नसल्याने शासनाच्या धान्य योजनेपासूनही ते वंचित राहत आहेत. 

आता लॉकडाउन वाढविल्याने उत्तर भारतीय कामगारांची मानसिकता परतण्याची झाली आहे. वांद्रेसारख्या परिस्थितीमुळे त्यांना मानसिक बळ मिळण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT