panopto-zoom-meeting-sharing-integration.jpg 
नाशिक

धक्‍कादायक! झुम ऍपवरील 'इतक्या' वापरकर्त्यांचा डेटा हॅक...डेटाची होतेय विक्री

सकाळवृत्तसेवा

नाशिक : सध्याच्या लॉकडाउनमुळे खासगी कंपन्यांतील कर्मचारी असो किंवा महाविद्यालय स्तरावरील लेक्‍चर घेण्यासाठी विविध डिजिटल माध्यमांचा उपयोग केला जात आहे. परंतु यापैकी काही ऍप असुरक्षित असल्याने सायबर सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यातील एक असलेल्या झूम या व्हिडिओ कॉलिंग ऍपवरील पाच लाख वापरकर्त्यांची माहिती गहाळ झाली आहे. हॅकर्स फोरम, डार्कवेबवर या डेटाची विक्री केली जात असल्याचा धक्‍कादायक प्रकार निदर्शनास आला आहे. 

ऍपच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न गंभीर

संपूर्ण प्रक्रिया ठप्प झालेली असल्याने एकाएकी विविध ऍपचा वापर वाढल्याचे दिसून आले आहे. यात व्हिडिओ कॉलिंग ऍपचे प्रमाण सर्वाधिक आहे. परंतु या ऍपच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न अत्यंत गंभीर बनला आहे. आपल्या सोयीसाठी डाउनलोड केलेले हे ऍप खासगी डेटाच्या चोरीचे कारण ठरू पाहत आहे. अशीच एक बातमी सुन्न करणारी आहे. सुमारे पाच लाख 30 हजार झूम अकाउंटवापरकर्त्यांचा डेटा केवळ पंधरा पैसे प्रतिखातेधारक या दराने विक्री केला जात आहे. या माहितीत वापरकर्त्याचा ई-मेल, पासवर्ड, पर्सनल मीटिंग युआरएल व होस्ट की अशा माहितीचा समावेश आहे. लिंक झालेला डेटा अनेक नामांकित कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांशी निगडित आहे. 

सावधगिरी महत्त्वाची 

सध्याच्या परिस्थितीत तंत्रज्ञानाचा वापर करताना सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे; अन्यथा हलगर्जी चांगलीच महागात पडू शकते. त्यासाठी आपण डाउनलोड करत असलेल्या सुरक्षिततेच्या स्तराविषयी खात्री करणे आवश्‍यक आहे. तसेच नियमिपणे पासवर्ड बदलणे व अन्य विविध उपाययोजना करणे आवश्‍यक आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni ruled out: महेंद्रसिंग धोनी दोन आठवड्यांसाठी IPL 2026 मधून बाहेर; CSK ला पहिल्या सामन्याआधी मोठा धक्का

Illegal Infant Disposal Case : आक्काताई लावत होती मृत अर्भकाची विल्हेवाट, नातेवाईकांनी नकार दिल्यास थेट उघड्यावर अर्भक फेकायचे; पेशंटचीही होणार चौकशी

Latest Marathi News Live Update : कोकणचा राजा हापूस आणि पायरी आंबा बाजारात दाखल

Pune News: महापालिकेच्या जागेवर बेकायदा खाऊगल्ली; कर्वेनगरमधील प्रकार; आर्थिक फायद्यासाठी खासगी वापराचा आरोप

IPL 2026 Marathi News: जसप्रीत बुमराह MI vs KKR सामन्यात नाही खेळणार? समोर आले मोठे अपडेट्स, CoE मध्ये झालेला दाखल

SCROLL FOR NEXT