nashik cold.jpg
nashik cold.jpg 
नाशिक

महाबळेश्‍वरपेक्षा नाशिकमध्ये गारठा अधिक! निफाडमध्ये ८.५ अंश; द्राक्षपंढरीत चिंतेचा सूर  

सकाळ वृत्तसेवा

नाशिक/निफाड/लासलगाव : महाबळेश्‍वरपेक्षा नाशिकमध्ये गारठा अधिक आहे. राज्यात सर्वांत कमी ९.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद गुरुवारी (ता. १२) पुण्यात झाली. तसेच महाबळेश्‍वरमध्ये १३.४, तर नाशिकमध्ये १०.४ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान होते. त्याचवेळी निफाडमध्ये नीचांकी ८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. निफाड तालुक्यात चार दिवसांत थंडीचा कडाका वाढला आहे. दिवसेंदिवस पारा घसरत चालल्याने द्राक्षपंढरी चिंतेच्या गर्तेत सापडली आहे. 

निफाडमध्ये ८.५ अंश सेल्सिअसची नोंद; द्राक्षपंढरीत चिंतेचा सूर 
गारठा वाढल्याने सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या दिशेत बदल झाल्याने गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा थंडीचा हंगाम लवकर सुरू झाला. गेल्या वर्षी निफाडमध्ये १२ नोव्हेंबर २०१९ ला २० अंश सेल्सिअसची नोंद झाली होती. कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागातर्फे ही माहिती देण्यात आली. चांदोरी, सायखेडा, उगाव, वनसगाव, निफाड, रानवड, सावरगाव, पिंपळगाव, कसबे सुकेणे, गोरठाण, विंचूर, शिरवाडे, कुंभारी, पंचकेश्वर ही द्राक्षपंढरीची पंचक्रोशी गारठून गेली आहे. निफाड तालुक्यात यापूर्वी पारा शून्यावर पोचल्याच्या नोंदी आहेत. 
हिवाळ्यात सतत तापमान घटत असल्याने द्राक्ष उत्पादकांना कडक्याच्या थंडीशी झुंजावे लागत आहे कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्षवेलींची नियमित वाढ खुंटत आहे. द्राक्षबागांची वेलींची‌ मुळे कार्यशील राहण्यासाठी पहाटे नियमित पाणी देण्याचे नियोजन द्राक्ष उत्पादकांना करावे लागत आहे. द्राक्षघडांची व पाने-शेंड्यांची वाढ होण्यास विलंब होऊ लागला आहे. भुरी रोगाला पोषक हवामान तयार झाल्याने द्राक्ष उत्पादकांच्या चिंता वाढल्या आहेत. रब्बी हंगामातील पिके व कांद्यास घसरलेले तापमान पोषक आहे. वाडी-वस्त्यांवर आता शेकोट्या पेटू लागल्या आहेत. 

निफाडमधील नोव्हेंबरमधील तापमान 
(किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये) 

तारीख किमान तापमान 
२ १८.५ 
४ १६ 
५ १४ 
६ १२ 
७ ११.५ 
९ ११ 
१० १० 
११ ९ 

हेही वाचा > मामा होता म्हणून भाची सहीसलामत! अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले भाचीला
 
निफाड तालुक्यात थंड हवामान द्राक्ष घड-शेंडे वाढ थांबवत आहे. लॉकडाउनमध्ये द्राक्षे कमी भावात विकावी लागली. नंतर रेंगाळलेल्या पावसामुळे गोड्या बहाराच्या छाटणीस विलंब झाला. आता थंडी हुडहुडी भरवू लागलीय. थंडीचा वेलींसह उत्पादनावरील परिणामाचा धोका आहे. - संतोष मापारी (द्राक्ष उत्पादक, उगाव) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ponzi Scam: 100 कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पुणे, नाशिक अन् कोल्हापुरात छापे! काय आहे प्रकरण?

Canada Accident: कॅनडात भारतीय आजी-आजोबांसह तीन महिन्याच्या नातवाचा अपघातात मृत्यू; दुतावासही हळहळलं

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

SCROLL FOR NEXT