Mega thermal power station Sakal
नाशिक

Nashik News : औष्णिक वीज केंद्रातील एका संचातून 100 दिवसांहून अधिक दिवस निर्मितीचा उच्चांक

नीलेश छाजेड : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : येथील औष्णिक वीज केंद्रातील संच क्रमांक चारने सलग १०० दिवस वीजनिर्मितीचा उच्चांक केला आहे.

नाशिक औष्णिक वीज केंद्रातील टप्पा दोनमधील तिन्ही संच चाळिशीतील आहेत. निवृत्तीच्या काळातही उत्तम कामगिरी करून येथील काम करणाऱ्या अधिकारी, अभियंता, कामगारांनी गुणवत्ता सिद्ध केली आहे. (More than 100 days of generation from one set in thermal power station nashik news)

या निर्मिती संचाने दोन वर्षांपूर्वी २१० वॉट क्षमता असतानाही २२४ वॉट वीजनिर्मिती साध्य केली होती. सध्या तीन संचांपैकी दोन संचांमधून वीजनिर्मिती सुरू आहे.

मात्र, महानिर्मितीला विजेची अधिकची गरज भासते किंवा इतर ठिकाणचे काही संच बंद असल्यास नाशिकचे तिन्ही संच चालविण्यात येतात. मात्र, येथे दोनच संचांचे मनुष्यबळ आहे. तरीही येथील संच सुरळीत चालावे, यासाठी नाशिकचा कर्मचारी/कंत्राटी कामगार तत्पर असतो.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नाशिकचे वीजनिर्मिती केंद्र मुंबईलगतचे असून, ग्रीड स्टेबिलिटीसाठी महत्त्वाचे तसेच वीज गळती नगण्य असतानाही फक्त राजकीय इच्छाशक्तीअभावी येथील प्रस्तावित प्रकल्प ६६० मेगावॉटचे काम पुढे सरकले नाही, हे मात्र नाशिककरांचे दुर्दैव म्हणावे लागेल.

नाशिक औष्णिक वीज केंद्राने आजवरच्या कालावधीत अनेक उच्चांकी कामगिरी केली आहे. भविष्यात जोवर सुरू आहे, तोवर करीत राहील, असा विश्‍वास येथील कामगारांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला.

"संच १०० दिवसांहून अधिक अविरतपणे सुरू आहे. यात अधिकारी, अभियंते, कामगार, कंत्राटदार व कंत्राटी कामगार यांचे अमूल्य योगदान आहे." - नितीन पुणेकर, मुख्य अभियंता, नाशिक औष्णिक वीज केंद्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Nagpur EVM Training: आगामी निवडणुकीत ‘एस-३’ मतदान यंत्राचा वापर;नागपूर जिल्ह्याला तीन हजार कंट्रोल युनिट प्राप्त; कार्यपद्धतीचे प्रशिक्षण

पत्नीशी वडिलांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, ३२ वर्षीय मुलाने वडिलांना झोपेतच संपवलं; डोंबिवली हादरली

SCROLL FOR NEXT