Factory Seal file photo esakal
नाशिक

Nashik News : ‘कागदा’वर 100 हून अधिक कारखाने सील! अनधिकृत प्लास्टिक कारखान्यांत ‘फुकट’ची वीज

‘पर्यावरणाचे अपरिमित नुकसान होत असल्याने राष्ट्रीय हरित लवादाने २०१९ मध्ये मालेगाव शहरातील २२० प्लास्टिकचे कारखाने बंद करण्याचे आदेश दिले होते.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : ‘पर्यावरणाचे अपरिमित नुकसान होत असल्याने राष्ट्रीय हरित लवादाने २०१९ मध्ये मालेगाव शहरातील २२० प्लास्टिकचे कारखाने बंद करण्याचे आदेश दिले होते.

या आदेशानंतरही सुमारे १०० हून अधिक प्लास्टिकचे कारखाने अनधिकृपणे सर्रासपणे सुरू आहेत. (More than 100 factories sealed on paper in malegaon city nashik news)

या प्लास्टिक कारखान्यांमध्ये १०० टक्के फुकटची वीज वापरली जात आहे. राजकीय वरदहस्तामुळे या कारखान्यांवर कारवाई करणे अत्यंत जिकिरीचे बनले आहे. कागदोपत्री मालेगावातील सर्व प्लास्टिकच्या कारखान्यांना ‘सील’ ठोकण्यात आले आहे. मात्र, छुप्या पद्धतीने हे कारखाने अजूनही सुरू आहेत.

विशेष म्हणजे या संदर्भात तक्रारी आल्यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पथक नाशिकमधून मालेगावमध्ये पाहणीसाठी जाते. त्या वेळेपुरते हे कारखाने बंद ठेवले जातात. पथक येणार असल्याची आगाऊ सूचना व्यवस्थितपणे संबंधितांना पोहोचलेली असल्याने केवळ पाहणीचे सोपस्कार पार पडतात. नंतर लगेचच बिनदिक्कतपणे कारखाने सुरू राहतात. खासकरून रात्रीच्या वेळी आकडे टाकून पूर्ण क्षमतेने कारखाने चालविले जात आहेत.

मालेगावमध्ये २२० पैकी १०० हून अधिक अनधिकृत प्लास्टिक कारखाने सध्याच्या घडीलाही सुरू आहेत. राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयानंतर २२० प्लास्टिक कारखान्यांची वीज तोडण्यात आली होती. वीज महामंडळाने त्यावेळी ही कारवाई केली होती. काही कारखाने अन्य भागांत स्थलांतरित झाले आहेत.

या कारखान्यांमध्ये ‘मोल्डिंग’ची कामे केली जातात. ‘वेस्ट प्लास्टिक’ला ‘प्रोसेस’ करणारेही काही कारखाने आहेत. वीजचोरी करताना आढळणाऱ्यांविरुद्ध केसेस दाखल होतात. केसेसनंतर दंडात्मक वाढीव बिल बनवले तरी वीजचोरी करणाऱ्यांना त्याचा काहीही फरक पडत नाही. कारण, त्यांना बिल भरायचेच नसते.

शिवाय, पोलिस कारवाईही होत नसल्याने हे वीजचोर मोकाट बनले आहेत. सराईतपणे आणि बिनबोभाटपणे होणारी वीजचोरी रोखायची झाल्यास प्रचंड राजकीय आणि पोलिस दलाच्या इच्छाशक्तीची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

India Vs England : दुसऱ्या कसोटीतील लाजीरवाण्या पराभवानंतर इंग्लंडचा मोठा निर्णय, 'या' वेगवान गोलंदाजाचा केला संघात समावेश

Weekly Astrology 7 to 13 July 2025: या आठवड्यात कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ अन् नोकरी व्यवसायत मिळेल उत्तम संधी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Maharashtra News Updates : चांदोरीतील गोदावरी नदीपात्राच्या बाहेर पाणी, खंडेराव महाराज मंदिराला पाण्याचा वेढा

Global Club Championship: पाकिस्तानला डावलण्याची शक्यता; जागतिक क्लब अजिंक्यपद स्पर्धा : पाच संघांचा सहभाग

SCROLL FOR NEXT