World Mental Health Day 2023 sakal
नाशिक

World Mental Health Day : उपचारापासून वंचित 40 टक्क्‍यांहून अधिक मानसिक रुग्‍ण

सकाळ वृत्तसेवा

World Mental Health Day : वेगवेगळ्या कारणांनी मानसिक आजारांचे प्रमाण वाढत असताना, दुसरीकडे या रुग्‍णांपैकी ४० टक्क्यांहून अधिक रुग्‍ण उपचारापासून वंचित राहत आहेत. ‘डिप्रेशन’चा सामना करत असलेल्‍या दहापैकी अवघे तीन रुग्‍ण उपचार प्रक्रियेत दाखल होतात.

हा विरोधाभास दूर करण्यासाठी यंदाच्‍या जागतिक मानसिक आरोग्‍य दिनाला ‘मेंटल हेल्‍थ इज युनिव्‍हर्सल राइट’ अशी संकल्‍पना निश्‍चित केली आहे. छोटी होत असलेली कुटुंबव्‍यवस्‍था, धकाधकीचे जीवन, गॅझेटचा अतिरेक वापर यांसह व्‍यायामाचा अभाव अशा विविध कारणांनी सौम्‍य ते गंभीर स्वरूपाचे मानसिक आजार उद्भवत आहेत.

इतर शारीरिक आजारांत वेदना किंवा अन्‍य तक्रारी लक्षात येत असल्‍याने रुग्‍ण तातडीने डॉक्‍टरांच्‍या मार्गदर्शनाखाली उपचार घेतात. (More than 40 percentage of mentally ill patients are deprived of treatment World Mental Health Day nashik news)

परंतु मानसिक आजारांबाबत बहुतांश वेळा रुग्‍ण किंवा त्‍यांचे नातेवाईक, मित्रांना कल्‍पना नसल्‍याने असे रुग्‍ण उपचारापासून वंचित राहात असल्‍याचे एकविसाव्या शतकातही धगधगते वास्‍तव आहे. दहा-वीस वर्षांमध्ये समाजात मानसिक आरोग्‍याविषयी सजगता वाढली आहे.

परंतु अद्यापही सुमारे ४० टक्क्‍यांहून अधिक रुग्‍ण उपचार प्रक्रियेतच दाखल होत नसल्‍याने आणखी व्‍यापक प्रमाणात जनजागृती होण्याची आवश्‍यकता व्‍यक्‍त केली जात आहे. याबाबत दखल घेताना या वर्षीच्‍या जागतिक मानसिक आरोग्‍य दिनानिमित्त ‘मेंटल हेल्‍थ इज युनिव्‍हर्सल राइट’ अशी संकल्‍पना निश्‍चित करण्यात आली आहे.

अर्थसंकल्पात अत्‍यल्‍प खर्च

शिक्षण व आरोग्‍यावर जास्‍तीत जास्‍त खर्च होणे अपेक्षित असताना प्रत्‍यक्षात हे प्रमाण अत्‍यल्‍प आहे. त्‍यातही आरोग्‍य क्षेत्रावर होणाऱ्या खर्चापैकी मानसिक आरोग्‍यासाठी होणारा खर्च नगण्य आहे. प्रत्‍येक जिल्‍हास्‍तरावर विशेष रुग्‍णालयदेखील नाही. तर मोठमोठ्या कॉर्पोरेट हॉस्‍पिटलमध्येदेखील एक किंवा दोन मानसोपचार तज्‍ज्ञांवर उपचाराचा भार असतो.

सामाजिक प्रश्‍न गंभीर

अनेक रुग्‍णांवर उपचाराअभावी अनेक सामाजिक प्रश्‍न गंभीर बनत आहेत. लैंगिक समस्‍या मानसिक आजाराशी निगडित असून, यामुळे थेट लग्‍न मोडण्यापर्यंत वेळ ओढावत आहे. काही रुग्‍णांना नोकरीपासून मुकावे लागत आहे. तर काहींकडून आत्‍महत्‍येसारखे टोकाचे पाऊल उचलले जात आहे. काही जण हिंसक होऊन इतरांना इजा पोचवत असल्‍याची चिंताजनक बाब सध्या उद्‌भवलेली आहे.

"मानसिक आजारांचे प्रमाण वाढत असताना अनेक रुग्‍ण उपचारापासून वंचित राहात आहेत. काही रुग्‍ण विविध कारणांनी उपचार पूर्ण करत नाहीत. औषधोपचाराद्वारे लैंगिक समस्‍येपासून डिप्रेशन व अन्‍य आजार पूर्णपणे बरे होऊ शकतात. त्‍यामुळे समस्‍या जाणवल्‍यास रुग्‍ण किंवा त्‍यांचे नातेवाईक, मित्रांनी मानसोपचार तज्‍ज्ञांचा सल्‍ला घेणे आवश्‍यक आहे." - डॉ. हेमंत सोननीस, मानसोपचारतज्‍ज्ञ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT