MGNREGA  esakal
नाशिक

MGNREGA : ‘रोहयो’च्या सुधारित आकृतीबंधामधील विभागातील मंजूरपैकी बहुतांश पदे रिक्त!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी १ हजार १९ पदांच्या सुधारित आकृतिबंधास २०११ मध्ये मान्यता देण्यात आली होती. त्यात १३३ जण बाह्य यंत्रणेद्वारे घेण्याचा समावेश होता. आज राज्य सरकारने सुधारित आकृतिबंध मंजूर करत ८८६ पैकी १८७ पदे कमी करण्यात आली आहेत.

त्यामुळे नाशिकच्या विभागीय आयुक्तालयातील रोजगार हमी योजनेच्या उपायुक्त कार्यालयातील ५ अव्वल कारकून आणि ४ शिपाई यासह भरलेली सर्व पदे व्यपगत झाली आहेत. मंजूर झालेल्या पदांपैकी बहुतांश पदे रिक्त आहेत. (Most of sanctioned posts in department in revised MGNREGA scheme vacant nashik news)

सुधारित आकृतिबंधामुळे रोजगार हमी योजनेच्या कामांशी निगडित यंत्रणेला निराळ्या समस्येला सामोरे जावे लागणार असे चित्र पाहावयास मिळते. नागपूरच्या मनरेगा आयुक्तालयातील लेखाधिकारी एक, डाटा एंट्री ऑपरेटरची दोन, लिपिकाचे एक अशी चार पदे कमी झाली आहेत. आता तिथे १७ पदे असतील. राज्यातील विभागीय आयुक्तालयांमधील ८४ पदे कमी झाली असून सुधारित ७६ पदांवर कामकाज पाहावे लागेल. नाशिकच्या विभागीय आयुक्तालयातील १५ पदे कमी झाली असून आता १२ पदे उरली आहेत. अव्वल कारकुनची ५, लघुलेखक, लघूटंकलेखक, लिपिक असे प्रत्येकी एक, वाहनचालक ३, शिपाई ४ या पदांची कमी केलेल्या पदांमध्ये समावेश आहे.

राज्यातील ३३ जिल्हाधिकारी कार्यालयातील ६५ पदे कमी झाली आहेत. त्यात नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन पदांचा समावेश आहे. शिवाय ३४ जिल्हा परिषद कार्यालयांमधील ३४ पदे कमी झालीत. त्यात नाशिकच्या जिल्हा परिषदेतील शिपाई पदाचा समावेश आहे. तालुकास्तरीय आकृतिबंधामध्ये फारसा फरक झालेला नाही. ठाणे जिल्ह्यातील ८ पदे पालघरमध्ये देण्यात आली आहेत.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

बाह्य यंत्रणेद्वारे घ्यायचे मनुष्यबळ

० नागपूरचे मनरेगा आयुक्तालय : डाटा एंट्री ऑपरेटर- २

० विभागीय आयुक्त कार्यालये : वाहन चालक आणि शिपाई-२९

० जिल्हाधिकारी कार्यालये : वाहन चालक व शिपाई-६८

० जिल्हा परिषदा : शिपाई-३४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asim Sarode: असीम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द; 'हे' वादग्रस्त विधान भोवलं

World Cup 2025: ...अन् हरमनप्रीत कौर कोच अमोल मुजूमदारला पाहताच पडली पाया; विश्वविजयानंतरचा भावूक करणारा क्षण

Latest Marathi News Live Update : इचलकरंजी महापालिका निवडणूकीत पाणी प्रश्न पेटणार

Crime: तुझ्याशी बोलायचंय, काम झाल्यावर भेट...; विवाहित प्रियकरानं महिलेला बोलवलं, भयंकर कट रचून संपवलं, कारण काय?

Priyanka Gandhi: हवाप्रदूषण कमी करण्यासाठी एकत्र काम करू; खासदार प्रियांका गांधी वद्रा यांचे केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारला आवाहन

SCROLL FOR NEXT