new born baby esakal
नाशिक

'नकोशी'ला बेवारसपणे फेकणारी माता अखेर पोलीसांच्या ताब्यात

मोठाभाऊ पगार

देवळा (जि.नाशिक) : वासोळ येथे दोन दिवसांपूर्वी नवजात स्त्रीजातीच्या अर्भकाला (new born baby) कपड्यांमध्ये गुंडाळून बेवारसपणे फेकणाऱ्या महिलेचा शोध लागला आहे. पोलिसांनी संशयित महिलेला बुधवारी (ता. १६) चौकशीसाठी ताब्यात घेतले.

रात्रभर थंडीत हंबरडा फोडणाऱ्या बाळासाठी आईच्या काळजाला पाझर नसेल का फुटला?

वासोळ येथील आदिवासी वस्तीतील मोडक्या झोपडीजवळ नवजात स्त्रीजातीचे जिवंत अर्भक बेवारसपणे फेकून दिल्याची घटना सोमवारी (ता. १४) सकाळी उघडकीस आली होती. भुकेने व्याकूळ झालेले हे लहान अर्भक रात्रभर थंडीत हंबरडा फोडत होते. बाळाची नाळही तशीच होती. बाळाच्या रडण्यामुळे तेथील नागरिकांचे लक्ष गेल्याने बाळाचे प्राण वाचले. कुत्र्यांनी डाव्या पायाच्या पंजाचे लचके तोडल्यामुळे गंभीर दुखापत झाली. या घटनेची माहिती पोलिसपाटील कैलास खैरनार व तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत त्या अर्भकाला वासोळ येथील आरोग्यवर्धिनी उपकेंद्रात उपचारासाठी आणले. तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. देवळा पोलिस मातेचा शोध घेत असतानाच बुधवारी तिचा शोध लागला. वासोळ येथीलच असलेल्या या अविवाहित महिलेच्या पोटी प्रेमसंबंधातून अर्भक जन्माला आले. मात्र मातृत्वाबाबत समाज आपल्याला विचारणा करेल, या विचाराने महिलेने बाळ आदिवासी वस्तीतील मोडक्या झोपडीजवळ फेकून फरारी झाल्याची बाब उघडकीस आली. पोलिसांनी या मातेला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, तिची डीएनएची चाचणी केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT