MoU of ycmou with various institutions nashik news esakal
नाशिक

YCMOU News : ड्रोनचे प्रशिक्षण, आरोग्‍यसेविकाही घडविणार; मुक्‍त विद्यापीठाचे विविध संस्‍थांबरोबर सामंजस्‍य करार

सकाळ वृत्तसेवा

YCMOU News : यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाने नुकताच विविध नामांकित संस्‍था, कंपन्‍यांबरोबर सामंजस्‍य करार केला आहे. वेगवेगळ्या करारांतून ड्रोन हाताळण्याचे प्रशिक्षण, आरोग्‍यसेविका घडविणे, सैन्‍य दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुक्‍त विद्यापीठातून पदवी, पदव्‍युत्तर शिक्षणाची संधी उपलब्‍ध होईल.

तसेच, डिजिटल मार्केटिंग, सायबर सेक्युरिटीसह आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित इतर विविध शिक्षणक्रम विद्यार्थ्यांना उपलब्‍ध होऊ शकतील. वेगवेगळ्या दहा संस्‍थांबरोबर सामंजस्‍य करार करण्यात आला असल्‍याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी दिली आहे. (MoU of ycmou with various institutions nashik news)

या सामंजस्य करारांमुळे संबंधित संस्थांमार्फत कौशल्य आधारित शिक्षण, रोजगाराची संधी व मूल्यशिक्षण दिले जाईल. याचबरोबर सैन्य दलातील जवानांना विविध शाखांतील पदवी शिक्षणक्रम उपलब्ध होतील. विविध नावीन्यपूर्ण आणि आधुनिक शिक्षणक्रमांच्या संधी त्‍यांना उपलब्ध होतील. तसेच, ऑनलाइन शिक्षणामार्फत समाज माध्यमातील व्यावसायिक संधींबाबत मार्गदर्शन मिळणार आहे.

कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी सामंजस्य कराराबाबत समाधान व्यक्त करताना, यामुळे विद्यार्थ्यांना विविध संधी उपलब्ध होणार असल्‍याचे सांगितले. विद्यार्थ्यांना रोजगारभिमुख शिक्षण देण्यासाठी विद्यापीठ सतत प्रयत्नशील असल्‍याचे त्‍यांनी नमूद केले.

मुक्‍त विद्यापीठातर्फे एकाच वेळी इतक्या संस्थांबरोबर सामंजस्य करार प्रथमच करण्यात आले. ही बाब विद्यापीठाच्या दृष्टीने ज्ञानवर्धनाच्या कौशल्यधिष्ठीत मनुष्यकामे निर्मितीसाठी महत्त्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी विशद केले.

याबाबत उपस्थित मान्यवरांनी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सोनवणे यांचे विशेष कौतुक केले. अंतर्गत गुणवत्ता आश्वासन केंद्राचे संचालक डॉ. राम ठाकर यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव भटुप्रसाद पाटील यांनी आभार मानले. या वेळी विद्यापीठाचे व्यवस्थापन मंडळ सदस्य डॉ. जयदीप निकम, वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, जनसंपर्क अधिकारी महेंद्र बनसोडे आदी उपस्थित होते.

सामंजस्‍य करारांचा तपशील असा

* आद्यम योग संस्थेबरोबर कराराद्वारे क्युरेटिव योग शिक्षणक्रम राबविले जाणार

* टिमलिज प्रा. लि.बरोबर वाणिज्य शाखेतील पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ॲप्रेंटिसशिपचा लाभ होणार

* व्हेनिला स्किल्स प्रा. लि. सोबतच्‍या करारातून सोशल मीडिया मार्केटिंग प्रमाणपत्र शिक्षणक्रम

* ड्रोणाचार्य ॲकॅडमीबरोबरच्‍या करारामुळे ड्रोन ऑपरेटर प्रशिक्षण अभ्यासक्रम

* विगो फाउंडेशनबरोबर बौद्धिक स्वामित्व हक्क (पेटंट)विषयी जागरूकता निर्माण करणार

* बहाई ॲकॅडमीबरोबर मूल्यशिक्षणासंदर्भात प्रमाणपत्र शिक्षणक्रम राबविणार

* अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंटबरोबरच्या करारामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेतानाच रोजगाराची उपलब्धता

* भारतीय सैन्य दलाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी बी.ए., बी.कॉम. शिक्षणक्रम

* नपाते इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ केअर एज्युकेशनबरोबरच्‍या करारातून महिलांसाठी आरोग्यसेविका प्रशिक्षण शिक्षणक्रम सुरू करणार

* स्किल फॅक्टरी लर्निंग प्रा. लि.सोबत पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, इंगजीतून सायबर सिक्युरिटीचा शिक्षणक्रम राबविणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zilla Parishad Election : आदेश आला ! जिल्हा परिषद-पंचायत समितीचा धुरळा उडणार, आचारसंहिता दोन दिवसात शक्य, निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Bigg Boss Marathi 6 Live Update: 'केसावर फुगे' फेम गायक सचिन कुमावतची 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात एंट्री

Pune Crime : शेअर बाजाराच्या नावाने अडीच कोटींचा डल्ला! ट्रेडज इन्व्हेस्टमेंटच्या संचालकांना हैदराबाद विमानतळावर बेड्या

Latest Marathi News Live Update : मुंबईचा महापौर ठाकरे बंधू ठरवतील : जयंत पाटील

अभिनयाचा पडदा ते राजकारणाचं मैदान गाजवणारी दीपाली सय्यदची बिग बॉसमध्ये एंट्री !

SCROLL FOR NEXT