patil.jpg 
नाशिक

आर्थिकदृष्ट्या बळकटीकरणासाठी आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करा - जयंत पाटील

सकाळवृत्तसेवा

नाशिक : जिल्ह्यातील पाणी वापर संस्थानी स्वत: आत्मनिर्भर होऊन आपली आर्थिक स्थिती मजबूत होण्यासाठी आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करावी, असे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांनी केले. मंगळवारी (ता. 17) दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील वाघाड प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्थेस भेटीप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

तर संस्थेची उन्नतीच्या दिशेने वाटचाल होईल...

जयंत पाटील पुढे म्हणाले, वाघाड प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्थेचे कार्य आदर्शवत आहे. या संस्थेच्या कार्यक्षेत्रात महिलांचा सहभाग हा एक प्रकारे दिशादर्शकाची भूमिका बजावत असून यासोबतच उच्चशिक्षित तरूणांना या कार्यक्षेत्रात संधी दिल्यास त्यांच्या सहभागातून नवनवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने संस्थेची उन्नतीच्या दिशेने वाटचाल होईल, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. सद्यस्थितीतील पाण्याचे महत्व व भविष्यात पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन संस्थेने सुयोग्य पाणीचे नियोजन करून शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणीवाटप केले तर शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. परिणामी शेतकरी सधन होऊन संस्थाही आपोआपच समृध्द होईल.

कै. भरतभाऊ कावळे यांना श्रद्धांजली

कोरोनामुळे देश आर्थिक संकटात असून हळूहळू परिस्थिती पुर्वपदावर येण्यास सुरूवात झाली आहे. जिल्ह्यातील पाणी प्रश्न, रस्तेबांधणी अशा सुधारणांकडे प्रभावीपणे लक्ष देऊन लोकांच्या हिताचेच काम करण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचे जलसंपदा मंत्र्यांनी सांगितले. कार्यक्रमात जलसंपदा मंत्री पाटील यांच्यासमवेत उपस्थितांनी वाघाड प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्थेसाठी अविरत मेहनत घेणाऱ्या कै. भरतभाऊ कावळे यांना श्रद्धांजली वाहिली.

यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार नितीन पवार, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार जयंत जाधव, जलसंपदा विभागाचे सचिव तथा कार्यकारी संचालक एन. व्ही. शिंदे, अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, विजय घोगरे, कार्यकरी अभियंता योगेश सोनवणे, तहसीलदार पंकज पवार, गट विकास अधिकारी रत्नाकर पगार, शाखा अभियंता पंगरीकर, वाघाड प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शहाजी सोमवंशीआदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman: रशियन महिला सापडली ते गोकर्णचं घनदाट जंगल... माणूस हरवला की रस्ता ही सापडणार नाही, फोटो पाहा

रशियन महिलेच्या मुलींचे वडील कोण? भारतात का आली होती? मोठे अपडेट समोर

Latest Maharashtra News Updates : पंचगंगा नदीची पाणी पातळी चोवीस तासांत सहा फूट सहा इंचांनी वाढली

Local Elections 2025 : नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप, इच्छुकांचा अभ्यास, जिल्हा परिषद गट-गण प्रारूप रचना; निवडणूक मोर्चेबांधणीला सुरुवात

Kolhapur Chappal Prada : ‘प्राडा’ची टेक्निकल टीम कोल्हापुरी पायतान बघून भारावली, कारागिरांची हस्तकला पाहून म्हणाले...

SCROLL FOR NEXT