Hemant Godse Latest Marathi News esakal
नाशिक

MP Hemant Godse | कर्ज पुरवठ्यासाठी महामंडळ युवकांच्या दारी : खासदार गोडसे

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : उद्योग व्यवसायात आर्थिक मदत आणि उद्योग व्यवसायाच्या व्याप्ती वाढविण्यासाठी महामंडळाकडून सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महामंडळ तुमच्या दारी अशी मोहीम हाती घ्यावी असे आवाहन खासदार गोडसे यांनी केले. (MP Hemant Godse Statement Corporation youth door for loan provision Nashik news)

खासदार गोडसे यांनी रोजगार मेळाव्यानंतर युवकांच्या स्वयं रोजगार वाढीसाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे, यातूनच आज (ता.९) जिल्ह्यातील सर्व महामंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीस बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे संपर्क प्रमुख जयंत साठे, जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, शहराध्यक्ष प्रवीण तिदमे, महिला आघाडीच्या अध्यक्षा लक्ष्मीताई ताठे, शिवाजी भोर, संपत काळे उपस्थित होते.

श्री.गोडसे म्हणाले, महामंडळतंर्गत असलेल्या शासनाच्या विविध योजनांच्या लाभापासून स्वंयरोजगारांची निर्मिती करू पाहणारे छोटे व्यावसायिक आणि गरजू खूपच दूर असल्याची माहिती समोर येत आहे. शासन महामंडळांच्या निधीचा उपयोग गरजूंना होत नसल्याचे दिसते. महामंडळाकडून जाणारे कर्ज प्रकरण बँका मंजूर करत नाही ही बाब योग्य नाही.

हेही वाचा : Credit Score :असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

बँकांची बैठक

जिल्हाधिकारी कार्यालयात महामंडळाचे आणि जिल्ह्यातील बँकांचे प्रतिनिधींची संयुक्त बैठक होणार असल्याची माहिती खासदार गोडसे यांनी दिली. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप पाटील, ओबीसी महामंडळाचे एस.जी. तायडे, खादी ग्रामउद्योग महामंडळाचे सुधीर केंदळे, वसंतराव नाईक महामंडळाचे प्रताप पवार, महिला आर्थिक महामंडळाचे संजय गायकवाड, युवराज उखाणे, शबरी आदिवासी विकास महामंडळाचे मनोज शिंदे, संत रोहिदास चर्मकार विकास महामंडळाच्या प्रीतम भावसार, एकात्मिक विकास प्रकल्प विभागाचे प्रशांत साळवे, केतन पवार, शबरी आदिवासी महामंडळाचे प्रशांत ब्राह्मणकर, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अविनाश गायकर, दिव्यांग वित्त विकास महामंडळाचे सुनील लोंढे, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचे रोहित काळे आदी अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारच उपमुख्यमंत्री! रात्री उशिरा मुंबईकडे रवाना; प्रथमच महिलेकडे पद

काटेवाडी ते मंत्रालय... नेतृत्वासाठी तयार झालेलं व्यक्तिमत्त्व; सामाजिक कार्यकर्ता ते उपमुख्यमंत्रीपद, सुनेत्रा पवारांचा ऐतिहासिक प्रवास

Mumbai Traffic: मुंबईत १ तारखेपासून नवीन वाहतूक नियम; दक्षिण भागात अधिक कठोर नियम, 'या' वाहनांना प्रवेश नाही

Budget 2026: बजेट तयार करण्यासाठी किती वेळ लागतो? ‘ब्लू शीट’ म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या पडद्यामागची प्रक्रिया...

Pune Traffic : नवले पुलावर तीन ते पाच फेब्रुवारीदरम्यान लेन बंद; कात्रज जुना बोगदा आणि सेवा रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT