hemant godse latest marathi news esakal
नाशिक

खते साठविण्याची मालधक्क्यावर व्यवस्था करावी : खासदार हेमंत गोडसे

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : खरिपाचा हंगाम (Kharif Season) असल्याने येत्या काही महिन्यात शेतकऱ्यांना विविध खतांची (Fertilizers) मोठया प्रमाणावर गरज भासणार आहे. राज्य आणि राज्यातील विविध कंपन्यांकडून येणारी खते साठविण्यासाठी नाशिक रोड येथील रेल्वे मालधक्का गोदामात जागेची सोय करावी, अशी मागणी खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godse) यांनी भुसावळ विभागाचे विभागीय रेल्वे प्रबंधकांकडे केली. (MP Hemant Godse statement on storage of fertilizers Nashik Latest News)

जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांना खते पुरवणाऱ्या विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. जिल्हाधिकारी गंगाथरन. डी या वेळी उपस्थित होते. बैठकीत शासनाने ठरवून दिलेल्या कोट्यानुसार खत पुरविले जाणार आहे, असे सांगत खत विक्रेत्यांनी खते साठविण्यासाठी तसेच रेल्वे रॅक उभ्या करण्यासाठी नाशिक रोड मालधक्का गोदामात जागा उपलब्ध अशी मागणी केली होती.

त्यानुसार खासदारांनी मध्य रेल्वेच्या विभागीय प्रबंधकांकडे मागणी केली. रेल्वे मालधक्का गोदामात सिमेंटने भरलेल्या रॅक मोठया प्रमाणावर उभ्या असून, त्यातील अनेक सिमेंटचा अनावश्यक साठाही आहे. परिणामी खतांचा साठा करण्यासाठी गोदामात पुरेशी जागा उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे याची गंभीर दाखल श्री. गोडसे यांनी घेतली.

खरिपाचा हंगाम तोंडावर आल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठया प्रमाणावर खतांची गरज पडणार आहे. दरवर्षी खतांचा तुटवडा निर्माण होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झालेले आहे. यामुळे पिकांना वेळेवर खते मिळत नसल्याने हाताशी आलेले पीक वाया जाऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते.

शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते उपलब्ध व्हावी, खतांचा तुटवडा पडू नये यासाठी रेल्वे धक्का गोदामात खते साठवणुकीसाठी पुरेशी जागा उपलब्ध करून द्यावी आणि खतांची वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे पत्र खासदार हेमंत गोडसे यांनी रेल्वे प्रशासनाला दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ohh Shit...! अभिषेक आजारी, त्यात स्टार फलंदाज झाला जखमी; जसप्रीतच्या यॉर्करवर डावी टाच दुखावली, वेदनेने कळवळला...

'जत्रा' चित्रपट लागला आणि भारतमाता थिएटरची भिंत तुटली... भरत जाधव यांनी सांगितला तो किस्सा

Latest Marathi News Live Update : बांधकाम नकाशा हीच अकृषिक परवानगी - जमीन महसूल कायद्यात सुधारणा

'सगळीकडे बोंबाबोंब' सिनेमातल्या 'त्या' गाण्यात अशोक सराफ इतके ताठ होऊन का नाचत होते? वर्षा यांनी सांगितलं खरं कारण

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत अपडेट! केंद्र सरकारने राज्यसभेत दिलं लेखी उत्तर; उद्या सरकारी कर्मचाऱ्यांचा संप

SCROLL FOR NEXT