Sakshi Maharaj advice to  Raj Thackeray
Sakshi Maharaj advice to Raj Thackeray esakal
नाशिक

Nashik : खासदार साक्षी महाराजांचा राज ठाकरेंना सल्ला

प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : भारत जगातील सर्वांत मोठे लोकतांत्रिक राष्ट्र (Democratic Nation) आहे. देशातील प्रत्येक हिंदू, मुस्लि, शीख, इसाई यांसह दलित, लहान, मोठा प्रत्येक जाती, धर्माच्या नागरिकाला अटक से कटक व काश्‍मिर ते कन्याकुमारीपर्यंत कुठेही जाण्याचे स्वातंत्र्य घटनेने दिले आहे. देशभरात कोणतीही व्यक्ती कोठेही येऊ-जाऊ शकते. तथापि राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांविरोधात असंसदीय भाषा (Unparliamentary language) वापरली आहे. जी त्यांना शोभा देत नाही. त्यांचा अंतरआत्मादेखील हे सांगत असेल. त्याच हेतूने त्यांनी सन्मानाने उत्तर भारतीयांची (North Indians) क्षमा मागावी, असा सल्ला खासदार साक्षी महाराज यांनी दिला. (MP Sakshi Maharajs advice to Raj Thackeray Nashik News)

खासदार साक्षी महाराज खासगी दौऱ्यावर शहरातील महेशनगर भागातील मतीन खॉँ, समीर शेख यांच्या निवासस्थानी आले होते. त्या वेळी त्यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले, की हिंदू-मुस्लिम (Hindu muslim) वाद निरर्थक आहे. हा वाद केव्हाच संपला असून, आता फक्त राष्ट्रवादाला साथ आहे. पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांचा ‘सब का साथ सबका विकास’ या माध्यमातून मुस्लिम समाज मोठ्या संख्येने भाजपशी जोडला गेला आहे. मी स्वत: आज मतीन खॉं व समीर शेख यांच्या निमंत्रणावरुन मुस्लिम कुटुंबाच्या भेटीसाठी मालेगावला आलो आहे. वाराणसीत हिंदू-मुस्लिम वाद नाही. हा वाद आक्रमणकर्ते (आक्रांता) व देशाचा आहे. देशावर आक्रमण करणारे सर्वांचे दुश्‍मनच होते. देश आहे तर आपण आहोत. त्यामुळे आम्ही राष्ट्राची राजनीती करतो. देशातील १३२ कोटी जनता आमची आहे. सर्वांनी प्रेम व सौदार्हाने राहणे गरजेचे आहे. खासगी दौऱ्यावर आलेल्या साक्षी महाराजांचे शेख कुटुंबीय व भाजप कार्यकर्त्यांनी स्वागत केले. शेख कुटुंबियांकडे चहा, नाश्‍ता घेतल्यानंतर ते रवाना झाले.

खासदार साक्षी महाराज यांनी शहरात आल्यानंतर शेरो शायरीतून आपल्या स्वभावाची प्रचिती दिली. महाराष्ट्राशी माझे निकटचे संबंध आहे. हे सांगताना त्यांनी मुंबई, नाशिक व त्र्यंबकेश्‍वर येथे माझे आश्रम आहे. माझी प्रतिमा कट्टर हिंदुत्ववादी नेता अशी आहे. त्यावर बोलताना ते म्हणाले, ‘मरे करीब आवो तो शायद जान सके मुझे’, माझ्या जवळ आलेला कायमचा माझा होतो. हिंदू-मुस्लीम सलोख्यावर बोलताना त्यांनी प्यार-मोहब्बत जज्बात कभी रुठा नही करते, रिश्‍ते है जन्मो के कभी टुटा नही करते । हा शेर सुनावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP vs BSP: खेळ राजकारणाचा! भाजप नेत्याच्या लेकाला मायावतींच्या पक्षाचे तिकीट

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील शाळांना आलेली धमकी पोकळ; घाबरण्याची गरज नाही.. गृह मंत्रालयाची माहिती

World Cupसाठी निवड झालेल्या 15 खेळाडूंची कशी आहे IPL मधील कामगिरी? उपकर्णधार पांड्या ठरतोय फ्लॉप

Shah Rukh Khan: "तो तर बॉलिवूडचा जावई, मी त्याला तेव्हापासून ओळखतोय, जेव्हा तो.."; किंग खानकडून किंग कोहलीवर कौतुकाचा वर्षाव

Nashik Lok Sabha Constituency : नाराजी दूर करण्यासाठी भुजबळांच्या दारी महाजन; बंद दाराआड सव्वा तास चर्चा

SCROLL FOR NEXT