Sanjay Raut on CM Shinde esakal
नाशिक

Sanjay Raut | मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकच्या पाण्यात जलसमाधी घ्यावी : खासदार राऊत

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : स्वाभिमानाच्या मुद्यावर शिवसेना सोडल्याचे मुख्यमंत्री सांगतात. मात्र सध्या पदोपदी महाराष्ट्राचा स्वाभिमान चिरडला जात आहे. शेजारच्या राज्यांच्या कागाळ्या वाढल्या आहेत. सीमावर्ती भागातील गावात शेजारील राज्यात समावेशाची भाषा सुरू झाली आहे. कर्नाटकने महाराष्ट्रात पाणी सोडले. पदोपदो छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होत आहे. आता कुठे गेला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा स्वाभिमान? असा प्रश्न करत कर्नाटकने सोडलेल्या पाण्यात मुख्यमंत्र्यांनी जलसमाधी घ्यावी, अशी टीका शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली. (MP Sanjay Raut statement on CM eknath shinde nashik daura nashik news)

श्री. राऊत नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी (ता. २) सकाळपासूनच त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर दुपारी नांदगावला शिवसेनेच्या मेळाव्याला रवाना होण्यापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, उपनेते सुनील बागूल, दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, माजी आमदार वसंत गिते, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, अजय बोरस्ते, विलास शिंदे आदी उपस्थित होते.

राऊत म्हणाले, की फुटीच्या भीतीने डॅमेज कंट्रोलसाठी हा दौरा बिलकूल नाही, शिवसेना आहे तेथेच आहे. मुंबई, कल्याणशिवाय ठाणे महापालिकेतही शिवसेनेला सत्ता मिळेल, अशी परिस्थिती आहे. राज्यभर सगळीकडे हेच वातावरण आहे. त्यामुळेच भीतीतूनच महापालिकेच्या निवडणुका वारंवार पुढे ढकलल्या जात आहेत. शिवसेनेतून बाहेर पडलेल्यांना निवडणूक आणि लोकांचीही भीती वाटत आहे. जे आमदार-खासदार शिवसेनेतून गेले, त्यांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावेच, असे आव्हान देत राऊत म्हणाले, की, राज्यभर सगळ्यांवर ‘गद्दार’ असा शिक्का बसला आहे.

हेही वाचा : वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून

अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातील ‘मेरा बाप चोर’ हे या हातावर लिहिलेल्या वाक्याप्रमाणे राज्यभर गद्दारांवर शिक्का बसला आहे. त्यामुळे लोक खोके वाल्यांना ‘खोके’ म्हणत आहेत. त्यांना सुरक्षेच्या गराड्यात फिरावे लागत आहे. याउलट आम्ही विनासुरक्षा बिनधास्त फिरत आहोत, असे म्हणत त्यांनी खासदार हेमंत गोडसे यांचे राजकीय करिअर संपले, अशा शब्दात टीका केली.

आघाडीचा प्रयोग कायम

देशातील हुकूमशाही संपविण्यासाठी राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यापुढे कायम राहील, असे स्पष्ट करीत, ते म्हणाले, की राज्यात यापूर्वी असे प्रयोग झाले आहेत. राज्यात ४० आमदारांचे मुख्यमंत्री असल्याने तीन महिन्यांपूर्वी केलेल्या बंडखोरीव्यतिरिक्त त्यांना काही सांगता येत नाही. शेजारील राज्यांकडून उपद्रव सुरू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रावण म्हटल्यावरून गुजरात निवडणुकीत विषय गाजत आहे. पंतप्रधानावर टीका वाईटच आहे. मात्र राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांवर टीका केली, तरी यांना वाईट कसे वाटत नाही. या सगळ्या अवमानाचा बदला घेतला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thackeray Brothers Morcha : निवडणूक आयोगाविरोधात आज ठाकरे बंधूंचा महामोर्चा; काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेतेही सहभागी होण्याची शक्यता, मोर्चा कधी अन् कुठून निघणार?

Pusad Excise Constable Attack : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला लाच मागितल्याच्या वादातून मारहाण; आरोपी अटकेत

Latest Marathi News Live Update : मोर्चासाठी ठाण्यातून शिवसैनिक-मनसैनिक मुंबईकडे रवाना

Samruddhi Expressway Accident : समृद्धीवर पुन्हा भीषण अपघात १७ जण जखमी ; पीकअपचा टायर निघाल्याने वाहन उलटले

Konkan Water: कोकणचे पाणी घाटमाथ्यावर आणणे शक्य : प्रफुल्ल कदम; ‘वॉटर लिंक टनेल्स’ उभा करण्याचा प्रस्ताव

SCROLL FOR NEXT