MPSC changed date of Examination nashik Marathi news
MPSC changed date of Examination nashik Marathi news 
नाशिक

राज्‍यसेवा पूर्व परीक्षेच्‍या तारखेत पुन्‍हा बदल... 'या' तारखेला होणार परीक्षा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्‍यसेवा पूर्व परीक्षा २०१९ च्‍या तारखेत पुन्‍हा एकदा बदल करण्यात आला आहे. यापूर्वी तारखेत दोनवेळा बदल करण्यात आला आहे. यापूर्वी जाहीर केलेल्‍या तारखेला वैद्यकीय अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशासाठी राष्ट्रीय स्‍तरावर नीट परीक्षा होणार असल्‍याने पुन्‍हा एकदा एमपीएससीतर्फे परीक्षेची तारीख बदलली आहे. सुधारीत वेळापत्रकानुसार २० सप्‍टेंबरला परीक्षा घेण्याचे नियोजित आहे.
 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे बुधवारी (ता.१२) परीपत्रक जारी करत वेळापत्रकात बदल केल्‍याचे कळविले आहे. २३ डिसेंबर २०१९ ला प्रसिद्ध केलेल्‍या जाहिरातीस अनुसरून राज्‍य सेवा पूर्व परीक्षा २०१९ यापूर्वी ५ एप्रिलला घेण्याचे प्रस्‍तावित होते. परंतु कोरोना विषाणुमूळे उद्भवलेल्‍या परीस्‍थितीत परीक्षा पुढे ढकण्याचा निर्णय होता. यानंतर १७ जूनला जारी केलेल्‍या परीपत्रकानुसार ही परीक्षा १३  सप्‍टेंबरला घेण्याचे जाहीर केले होते.

आयोगाकडून दिनांक निश्‍चित करण्यात आल्‍यानंतर राष्ट्रीय परीक्षा संस्‍थे (नॅशनल टेस्‍टींग एजन्‍सी) कडून ३ जुलैला सूचनेद्वारे राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) १३ सप्‍टेंबरला घेण्याचे निश्‍चित केले असल्‍याचे कळविले होते. आयोगामार्फत आयोजित विषयांकित परीक्षेकरीता उमेदवारांची संख्या तसेच राष्ट्रीय परीक्षा संस्‍थेकडून घेण्यात येणार्या परीक्षेकरीता प्रवेश देण्यात उमेदवारांची संख्या लक्षात घेता, दोन्‍ही परीक्षांचे एकाच दिवशी आयोजन करण्यास परीक्षा उपकेंद्राच्‍या उपलब्‍धतेसह अन्‍य प्रशासकीय अडचणी निर्माण होत असल्‍याची बाब निदर्शनात आल्‍याचे नमूद केले आहे.

'या' तारखेला होणार परीक्षा

राष्ट्रीय परीक्षा संस्‍थेकडून  घेण्यात येणारी परीक्षा ही देशपातळीवर घेण्यात येणार आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशासकीय कारणास्‍तव महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विषयांकित राज्‍यसेवा पूर्व परीक्षा २०२० ही २० सप्‍टेंबरला  घेतली जाणार असल्‍याचे स्‍पष्ट केले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता उमेदवार व परीक्षा आयोजनातील सर्व कमृचारी यांच्‍या सुरक्षेसाठी आयोगाकडून आवश्‍यक उपाययोजना केल्‍या जातील, असे स्‍पष्ट केले आहे. 

संपादन - रोहित कणसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT