MPSC latest marathi news esakal
नाशिक

MPSC दुय्यम सेवा परीक्षेच्‍या अर्जासाठी 24 जुलैपर्यंत मुदतवाढ

अरुण मलाणी

नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित संयुक्‍त पूर्व परीक्षा (Maharashtra Secondary Services Non Gazetted Joint Prelims Exam) २०२२ घेतली जाणार आहे.

या परीक्षेला प्रविष्ठ होण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत वाढविली आहे. सुधारीत वेळापत्रकानुसार उमेदवारांना २४ जुलैपर्यंत संकेतस्‍थळावर अर्ज भरता येईल. (MPSC Secondary Services Exam Application Deadline Extension Till 24th July Nashik Latest Marathi news)

एमपीएससीतर्फे गेल्‍या २३ जूनला महाराष्ट्र अराजपत्रित संयुक्‍त पूर्व परीक्षा २०२२ संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध केली होती. या परीक्षेला प्रविष्ट होण्याची मुदत संपत असताना, त्‍यात मुदतवाढीचा निर्णय आयोगाने घेतला आहे.

त्‍यानुसार परीक्षेकरीता ऑनलाइन अर्ज भरुन, ऑनलाइन स्‍वरुपात शुल्‍क भरण्याची प्रक्रिया करण्यासाठी २४ जुलैपर्यंत मुदत असेल. स्‍टेट बँक ऑफ इंडिया यांच्‍यामार्फत चलनाद्वारे परीक्षा शुल्‍क भरणाऱ्या उमेदवारांनी निर्धारीत शुल्‍क २५ जुलैपर्यंत भरायचे आहे. निर्धारीत मुदतीनंतर शुल्‍क भरणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पात्र समजले जाणार नसल्‍याचे स्‍पष्ट करण्यात आले आहे.

आठशे पदांसाठी परीक्षा

या परीक्षेच्‍या माध्यमातून ८०० पदांची भरती केली जाणार आहे. पोलिस उपनिरीक्षक ६०३, सहायक कक्ष अधिकारी करीताची ४२ पदे, राज्‍य कर निरीक्षकाची ७७ पदे, दुय्यम निबंधक ७८ पदांचा समावेश आहे. या पदांकरीता संवर्गनिहाय आरक्षण लागू राहाणार आहे. ८ ऑक्‍टोबरला राज्‍यभरातील परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT