MSRTC Bus esakal
नाशिक

Nashik : अबबं...35 प्रवांशाचा जीव धोक्यात घालुन मागच्या 3 चाकांवर धावली लालपरी!

सकाळ वृत्तसेवा

इगतपुरी शहर (जि. नाशिक) : रात्रीच्या दरम्यान ३५ प्रवाशांचा जीव धोक्यात घालत महामंडळाच्या बसचालकाने बसच्या मागील चार पैकी तीन चाकांवर अकोले-कसारा असा प्रवास केला. (MSRTC Bus ran on back 3 wheel risking lives of 35 people at igatpuri nashik Latest Marathi News)

सोमवारी (ता.७) रात्री अकोले आगारातून अकोले-कसारा बस (एमएच १५ बीटी ४१२९) ही ३५ प्रवाशांना घेऊन सायंकाळच्या सुमारास कसाराकडे निघाली. सदरची बस ही इगतपुरी जवळील महिंद्रा कंपनीजवळ आली असता पाठीमागून बसला ओव्हरटेक करत असलेल्या वाहनचालकास दिसले की बसला पाठीमागे केवळ तीनच चाक आहे. त्यानंतर त्याने तत्काळ बसला ओव्हरटेक करत बसचालकास बस थांबविण्यास सांगितले. त्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला.

अकोलेहुन कसाराकडे येताना असल्याने अशा बेजबाबदार कारभारामुळे कोणतीही मोठी दुर्घटना घडू शकली असती. त्यानंतर इगतपुरी आगारातून नवीन टायर आणून बसला बसविण्यात आल्यानंतर ही बस कसाराकडे मार्गस्थ झाली. मात्र केवळ तीन चाकांवर बसने अकोले ते इगतपुरी असा प्रवास केला. या संपूर्ण प्रवासादरम्यान अनेक ठिकाणी वळणदार रस्ते, घाट होते. मात्र सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. परंतु प्रवाशांचा जीव असा प्रकारे धोक्यात घालणाऱ्या चालकावर कारवाई करण्याची मागणी यावेळी प्रवाशांनी केली.

इगतपुरी : अकोले आगाराची कसाराकडे जात असलेली एस..टी.

Remarks :

३५ प्रवाश्‍यांचा जीव धोक्यात घालत लालपरीचा प्रवास

Audit History:

Date/Time Description ActionBy

11/8/2022 4:14:10 PM Story received from B-IGATPURI2 popat.gavande

11/8/2022 5:19:33 PM Story Edited skunal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT