muhs election Counting of votes will on March 20 in university premises nashik news esakal
नाशिक

MUHS Election : MUHS निवडणूकीची मतमोजणी होणार; 42 केंद्रांवर झाले मतदान

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्‍या (MUHS) विविध प्राधिकरण मंडळांकरिता निवडणूक घेण्यात आली. (muhs election Counting of votes will on March 20 in university premises nashik news)

शुक्रवारी (ता.१७) राज्‍यातील ४२ मतदान केंद्रांवर मतदान झाले होते. यानंतर सोमवारी (ता.२०) सकाळी दहापासून विद्यापीठाच्‍या आवारात मतमोजणीला सुरवात होणार आहे. विद्यापीठातर्फे निवडणूक निर्णय अधिकारी म्‍हणून कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ जबाबदारी सांभाळत आहेत. शुक्रवारी (ता.१७) राज्‍यभरातील ४२ केंद्रांवर ५७.८७ टक्‍के मतदान झाले होते.

विद्यापीठ अधिसभा, अभ्यासमंडळ, प्राध्यापक वगळता शिक्षक गटातील मतदानाचा समावेश होता. निवडणुकीसाठी अकरा हजार ७४२ मतदारांपैकी सहा हजार ७९५ मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला होता. राज्यात सर्वाधिक मतदान वाशीम जिल्ह्यातील महिला उत्कर्ष प्रतिष्ठान आयुर्वेदिक महाविद्यालय येथील केंद्रावर झाले होते.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

मतदानाचे प्रमाण शंभर टक्‍के होते. सर्वात कमी अवघे १२.८१ टक्‍के मतदान पुणे येथील आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज येथे नोंदविले गेले. राज्‍यभरातील केंद्रांवरून येणाऱ्या मतपेट्या स्‍विकारण्याकरिता विद्यापीठ मुख्यालयात कक्ष कार्यान्‍वित केलेला आहे.

सर्व मतपेट्या संकलित झाल्‍यानंतर आता सोमवारी (ता.२०) सकाळी दहापासून मतमोजणीला सुरवात होईल. याच वेळी निकालदेखील जाहीर केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT