Newly elected office bearers, members of Maharashtra University of Health Sciences Student Council Election along with University Officers. esakal
नाशिक

MUHS Student Council Election: यशराज, सफाल, स्‍वराज अधिसभेवर; आरोग्‍य विद्यापीठात विद्यार्थी परिषद निवडणूक

सकाळ वृत्तसेवा

MUHS Student Council Election : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात विद्यार्थी परिषद निवडणूक झाली. या वेळी विद्यार्थ्यांमधून तीन अधिसभा सदस्‍यांची निवड झाली. नागपूरचा यशराज देशमुख, मुंबईचा सफाल बूब आणि अमरावतीचा स्‍वराज सानप या तिघांची अधिसभेवर निवड झाली.

तसेच विद्यापीठ विद्यार्थी परिषदेसाठी पदाधिकाऱ्यांची निवड झाली. (MUHS Student Council Election Yash Raj Safal Swaraj on Adhisabha Student Council Election in Health University nashik news)

निवडणुकीनंतर विद्यापीठ विद्यार्थी परिषदेवर विजयी पदाधिकाऱ्यांचे विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर, प्र-कुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ, निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी अभिनंदन केले.

विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ यांनी विद्यापीठ विद्यार्थी परिषदेवरील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, की विद्यार्थी प्रतिनिधींनी विद्यापीठाच्या विविध कल्याणकारी योजना विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्‍न करावेत.

विद्यार्थी विद्यापीठाचा केंद्रबिंदू आहे. विद्यापीठ प्रशासन, विद्यार्थ्यांमध्ये योग्य समन्वय राहण्यासाठी विद्यार्थी प्रतिनिधींची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ म्‍हणाले, की महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियमांतर्गत विद्यापीठाच्या अधिसभेवर तीन विद्यार्थी प्रतिनिधी निवडण्याची तरतूद आहे.

त्यानुसार निवडणूक प्रक्रियेद्वारे नागपूरचे एन. के. पी. साळवे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचा यशराज देशमुख, मुंबईच्या एचबीटी मेडिकल कॉलेजचा सफाल बूब आणि अमरावतीच्या डॉ. पीडीएम मेडिकल कॉलेजचा स्‍वराज सानप या तीन सदस्यांची विद्यापीठाच्या अधिसभेवर निवड झाली.

विद्यापीठ परिषद निवडणूकीसाठी उपस्थित सदस्यांना उपकुलसचिव महेंद्र कोठावदे यांनी निवडणूक प्रक्रियेबाबत माहिती दिली. निवडणूक प्रक्रियेनंतर त्वरित मतमोजणी होऊन विद्यापीठाचे कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी निकाल घोषित केला.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

निवडणूक प्रक्रियेसाठी कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजेंद्र बंगाळ, मतमोजणीतज्ज्ञ म्हणून श्रीमती बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे फुलचंद अग्रवाल, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. मनोजकुमार मोरे, डॉ. सुनील फुगारे, महेंद्र कोठावदे, राजेंद्र नाकवे, बाळासाहेब पेंढारकर, डॉ. स्वप्नील तोरणे, संदीप राठोड, संजय कापडणीस उपस्थित होते.

विद्यार्थी परिषद अध्यक्षपदी राहुरीचा धीरज भोसले

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ विद्यार्थी परिषदेवर एक अध्यक्ष, दोन उपाध्यक्ष, एक सचिव आणि दोन सहसचिव निवडण्याची तरतूद आहे. यानुसार विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षपदी राहुरीतील ‘एसव्हीएनएचटी’च्या आयुर्वेद महाविद्यालयाचा धीरज भोसले याची निवड झाली.

उपाध्यक्षपदी नाशिकच्या ‘मविप्र’‍ संचालित कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचा दानिश शेख आणि औरंगाबाद येथील बीकेएमएम होमिओपॅथी महाविद्यालयाचा प्रमोद काटकर यांची निवड झाली. सचिव पदासाठी पुण्याच्या टिळक आयुर्वेद महाविद्यालयाची रुही शाहेद अली हिची बिनविरोध निवड झाली.

सहसचिव पदासाठी संगमनेर येथील एमएचएफ होमिओपॅथी मेडिकल कॉलेजची कोमल पुर्हे आणि नागपूर येथील श्री. के. आर. पांडव आयुर्वेद महाविद्यालयाचा उत्‍कर्ष भुरले यांची निवड झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune–Bengaluru Highway : पुणे-बंगळूर महामार्गावर वाहतुकीची कशी आहे स्थिती? कराड-सातारा रस्ता होतोय जाम, वाहनांचा धिम्या गतीने प्रवास

PSI सोबत ६ महिने संपर्क नाही, बनकरशी त्याचदिवशी वाद; रात्रभर फोटो अन् मेसेज पाठवले; चाकणकर यांनी दिली माहिती

'पैशासाठीच प्रमोद महाजनांची हत्या? प्रवीण महाजन भावाला करत होते ब्लॅकमेल'; प्रकाश महाजनांच्या दाव्यावर काय म्हणाल्या सारंगी महाजन?

Latest Marathi News Live Update :निलेश घायवळ टोळीतील फरार आरोपी बबलू सुरवसेला सांगलीतून अटक

Kolhapur Crime: काेल्हापूर जिल्ह्यात चोरट्यांची एक कोटीची ‘दिवाळी’; शहरासह गडहिंग्लज, कागल, गांधीनगरात डल्ला

SCROLL FOR NEXT