mulawad village xerox center take hundred rupees for one xerox copy 
नाशिक

ऐकावं ते नवलच! एका झेरॉक्ससाठी घेतात शंभर रुपये

दिनेश तायडे

मुलवड: गावात आश्रमशाळा, प्राथमिक आरोग्य केंद्राची सोय झाली; पण पाल्यांसाठी किंवा स्वतःसाठी, कार्यालयीन कामासाठी एखाद्या कागदपत्रांची झेरॉक्‍स काढायची म्हटले, की थेट ठाणापाडा, हरसूलशिवाय पर्याय नाही. तेथे जाण्य-येण्यासाठीच तब्बल शंभर रुपये मोजावे लागतात. इतर खर्च वेगळाच. त्यामुळेच येथे आजही एक रुपयांच्या झेरॉक्‍ससाठी शंभर रुपये खर्चावे लागत आहेत. "चार आण्याची कोंबडी अन्‌ बारा आण्याचा मसाला', या म्हणीचा प्रत्यय येतानाच डिजिटल इंडियातील अडथळे येथे दिसत आहेत.

नाशिकपासून शंभर किलोमीटर अंतरावर मुलवड हे 22 पाड्यांची ग्रामपंचायत आहे. प्रत्येक पाडा पाच ते सात किलोमीटर अंतरावर आहे. डिजिटल इंडियापासून हे गाव कोसो दूर आहे. हे गाव प्रगतीच्या दृष्टीने मागे आहे. गावापर्यंत रस्ता आहे. पण इतर पाड्यांवर जाण्यासाठी वाट शोधावी लागते.

काही ठिकाणी बंद पडलेल्या शाळा, तर परिसरातील मुलं आश्रमशाळांच्या भरवशावर. शिक्षणाबाबतीत पालकांची उदासीनता आहे. बोटावर मोजण्या जोगेच पालक आपल्या मुलांविषयी जागृत आहे. हरसूल, ठाणापाडा हे बाजारपेठेचे गाव 35 ते 40 किलोमीटर अंतरावर. ग्रामसेवक, तलाठी यांचे कार्यालयसुद्धा इथेच. गावात आठवड्यातून एकदा त्यांची भेट होते. गावामध्ये कोणत्याही प्रकारची नळयोजना नाही. गावाबाहेरच्या विहिरीतून येथील स्त्रियांना पाणी भरावे लागते. गावात आश्रमशाळा व प्राथमिक आरोग्य केंद्राची सोय करण्यात आली; पण येथील लोकांना एखाद्या कागदपत्रांची झेरॉक्‍स काढायची म्हटले, की ठाणापाडा, हरसूलशिवाय पर्याय नसल्याने तेथे जाण्य-येण्यासाठी शंभर रुपये मोजावे लागतात. इतर खर्च मात्र वेगळाच सहन करावा लागत आहे.

येथे पंधरा-पंधरा दिवस लाइट नसते. आशा परिस्थितीत रेशन दुकानावरचा केरोसीनचा साठा शासनाने कमी केल्यामुळे लोकांना रात्रीच्या काळोखात कुटुंबासह जीव मुठीत धरून झोपावे लागते. शासन बहुतांशी योजना राबविते. पण जीवनात कायमस्वरूपी बदल नाही. फक्त कुडांच्या भिंतीऐवजी विटांच्या भिंती दिसतात. भिंतीमधील जीवन हे तेच दारिद्य्राचे. पोटभर पिकांसाठी मेहनत जास्त करावी लागते. त्यावर फक्त वर्षभराचा उदरनिर्वाह होतो. त्यामुळे या भागातील लोकं नाशिक, गिरणारे येथे स्थलांतरित होतात.

प्रतिकूल परिस्थितीतही प्रतिकारशक्ती जास्त
प्रतिकूल परिस्थिती असली तरी लोकांचे जीवन निसर्गाच्या सानिध्यात व नियमानुसार, प्रदूषणविरहित असल्यामुळे प्रतिकारशक्ती जास्त आहे. त्यांना रक्तदाब, मधुमेह, कर्करोग यांसारखे गंभीर आजार नाही. या भागातील स्त्रियांच्या प्रसूतीसुद्धा सहज होतात. कुठल्याही भौतिक सुविधा उपलब्ध नसताना येथील लोकं मात्र आनंददायी जीवन जगतात, हे विशेष आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India CPI Inflation: देशात पुन्हा महागाईचा भडका! दुष्काळ अन् वाढत्या महागाईत ग्रामीण भागाची दुहेरी होरपळ

IND vs WI: विंडिजच्या दोन खेळाडूंवर ICC ची कारवाई; भारताविरुद्ध T20I मालिका सुरू असतानाच नेमकं काय घडलं?

Rahul Gandhi: राहुल गांधींचा मोठा दावा! म्हणाले, ''मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे मला मेसेज येतात..''

Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर कारखान्याच्या निवडणूकीत सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलची मुसंडी.... विजयाच्या दिशेने घौडदौड.....; पुरुषोत्तम जगताप यांना दारुण पराभव

Sri Lanka Politics: आधी मुलगा, आता पत्नी अडचणीत; महिंदा राजपक्षे ICU मध्ये, श्रीलंकेत सध्या काय घडतंय?

SCROLL FOR NEXT