corona 2.jpg 
नाशिक

'त्या' दोन्ही रुग्णांचे मुंबई कनेक्‍शन उघडकीस..तालुकावासीयांनी घेतला चांगलाच धसका 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक / घोटी : इगतपुरी तालुक्‍यातील रायांबे येथील नागरिकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ग्रामीण भागातील ही पहिलीच केस असल्याने तालुक्‍यातील प्रशासन खडबडून जागे झाले आहे. यापूर्वी घोटी शहरातील आरोग्य कर्मचारी बाधित असताना मुंबईत खासगी नोकरी करणाऱ्या रायांबे येथील एकाला कोरोना संसर्ग झाल्याचे पुढे आहे आहे. त्यामुळे तालुक्‍यातील दोन्ही रुग्णांचे मुंबई कनेक्‍शन असल्याचे पुढे आले आहे. 

असे आहे कनेक्शन..

तालुक्‍यात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दोन झाली आहे. रायांबे येथील नागरिक मुंबई येथे खासगी कंपनीत कामाला होता. आठ दिवसांपूर्वी तब्येत ठीक नसल्याने गावी आला होता. कुटुंबीयांनी त्याला नाशिकला खासगी रुग्णालयात उपचारासाठी ठेवले होते. त्याचा कोरोनाचा अहवाल आल्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. तालुका प्रशासनाला समजताच रायांबे येथे कुटुंबीयांची भेट घेत रुग्णाच्या संपर्कातील 11 नागरिकांचे अहवाल तपासणीसाठी पाठविले आहेत. तालुक्‍यातील दोन्ही रुग्णांचे मुंबई कनेक्‍शन समोर आल्याने, मुंबई कनेक्‍शनचा इगतपुरीत चांगलाच धसका घेतला आहे. तहसीलदार परमेश्‍वर कासुळे, गटविकास अधिकारी किरण जाधव, सहाय्यक गटविकास अधिकारी भरत वेंदे, तालुका आरोग्याधिकारी एम. बी. देशमुख, सहाय्यक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे यांनी भेट दिली. 

संपर्कातील 11 सदस्यांचे नमुने घेतले

मुंबई येथूनच लागण झाल्याचे समोर आल्याने संपर्कातील 11 सदस्यांचे नमुने घेतले आहेत. रुग्णास जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. नागरिकांनी काळजीपूर्वक सामाजिक अंतर राखत, मास्क वापरावे. -एम. बी. देशमुख, तालुका आरोग्याधिकारी, इगतपुरी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolkata Stamped: कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; १७ भाविकांचा मृत्यू

IND vs WI 5th T20I: भारत-वेस्ट इंडिज पाचव्या सामन्याचा निकाल लागला... ९-९ षटकांचा सामना नेमका कुणी जिंकला?

Resort Fire Tragedy : पर्यटकांच्या रिसॉर्टला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांसह १० पर्यटकांचा होरपळून मृत्यू, ९ गंभीर!

Couple Found Dead: पत्नीच्या वाढदिवशीच 'त्या' दोघांनी संपविले जीवन; 'आम्ही जग सोडतोय...!' कोणाला पाठवला ईमेल?

IND vs WI 5th T20I: इशान किशनचे वादळ, मोडला विक्रम; भारताने ९ षटकांच्या मॅचमध्ये किती धावा केल्या? पावसाने पुन्हा घोळ घातला

SCROLL FOR NEXT