Dwarka Circle esakal
नाशिक

Nashik News : मुंबई नाका ते द्वारका चौकांचा श्‍वास कोंडलेलाच! अतिक्रमणातही वाढ!

सकाळ वृत्तसेवा

द्वारका (जि. नाशिक) : मुंबई नाका व द्वारका भागात रोजच सांयकाळी प्रचंड वाहतुक कोंडी होत आहे. मुंबई नाका ते गडकरी चौक, भाभानगर, नवशक्ती चौक, तसेच वडाळा नाका, द्वारका ते सारडा सर्कल, टाकळी रोड, काठे गल्ली सिग्नल, वडाळा नाका ते सह्याद्री हॉस्पीटल चौक सिग्नल, काठे गल्ली ते मुंबई नाका या भागात रोजच वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे. (Mumbai Naka to Dwarka Chowk crowd Increase in encroachment nashik news)

या भागात खाद्यपदार्थाची दुकाने, गाड्यांचे अतिक्रमण व रस्त्याच्याकडेला दुकानापुढे उभ्या राहणाऱ्या वाहनांचे अतिक्रमण आणि रस्त्याच्या कडेला किंवा रस्त्यावर उभ्या वाहनांचे प्रमाण वाढलेले आहे. वाहतूक पोलिस मात्र दंड वसुलीतच जास्त रस घेताना दिसून येतात.

याभागात महामार्गावर उड्डाणपूल असूनही वाहतूक कोंडीची समस्या कमी झालेली नाही. शहरात न थांबणारी वाहनेही उड्डाणपुलाऐवजी शहरातील रस्ते आणि सर्व्हिस स्त्यांवरुन जाताना दिसतात.

नाशिक- पुणे रोडवरील डीजीपीनगर, अशोका हॉस्पीटल, इंदिरानगर जाँगींग ट्रॅक मार्गाने आग्रा रोडकडे जाणाऱ्या अवजड वाहतुकीला माजी महापौर सतीश कुलकर्णी यांच्यासह इंदिरानगर भागातील सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित बैठक घेऊन वाहतूक पोलिस उपआयुक्तांना निवेदन देऊन या भागातून जाणारी अवजड वाहतूक रोखली.

त्यामुळे त्या भागातून जाणारी अवजड वाहने आता काठे गल्ली, सह्याद्री हॉस्पीटल, भाभानगर मार्गे मुबंई नाक्याकडे व इतर रस्त्याने जाऊ लागल्याने द्वारका ते काठे गल्ली, काठे गल्ली ते मुबंई नाका या भागात अजूनही जास्त अवजड वाहतुक वाढली आहे. परिणामी, द्वारका ते काठे गल्ली सिग्नलपर्यंत अवजड वाहनांच्या रांगेत अधीकच भर पडली.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

द्वारका व मुंबई नाका चौकात एक दोन नव्हे, तर पाच ते सहा वाहतूक पोलिस उभे असतात. मात्र, त्यामुळे फारसा उपयोग होताना दिसत नाही. काठे गल्ली सिग्नल चौक व सह्याद्री हॉस्पीटल सिग्नल चौकात वाहतूक पोलिस नसल्याने नागरिक सिग्नलचे नियम पाळताना दिसत नाहीत.

त्यामुळे या दोन्ही चौकांत सतत लहान मोठे अपघात अन्‌ भांडणे होत आसतात. त्याचवेळी सिग्नलवर वाहतूकीचे तीनतेरा वाजतात. सह्याद्री हॉस्पिटल चौक व काठे गल्लीत कायमस्वरुपी वाहतूक पोलिस नेमणूक करावेत अशी मागणी नागरीक करत आहेत.

मनपाचे दुर्लक्ष अन्‌ पोलिसांची वसुली

मुंबई नाका भागात खाद्यपदार्थांची दुकाने थाटण्यात आलेली आहेत. काही दुकानदारांनी बाहेर छोटी दुकाने लावण्यास परवानगी देऊन त्यांच्याकडून भाडे घेतली जाते. अतिक्रमणाच्या बाबतीत नागरिकांनी अनेकवेळा लोकप्रतिनीधी व पोलिसांकडे तक्रारी करुनही महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून दुर्लक्ष केले जाते. तर वाहतूक पोलिस मात्र दुचाकीधारकांकडून दंड वसुलीत मग्न असल्याचे बघावयास मिळतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

Raj Thackeray: जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, राज ठाकरेंकडून भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांवर टीका

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT