NMC Election esakal
नाशिक

नाशिक : शहरात यंदा २०० मतदान केंद्रे वाढणार

विनोद बेदरकर

नाशिक : 3 उमेदवारांना एक मतदानासाठी दीड मिनिट वेळ लागणार, असे गृहीत धरून महापालिका निवडणुकीसाठी (Nmc Election) मतदारयादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

आधी कोरोना आणि त्यानंतर ओबीसी आरक्षणाच्या लढाईमुळे पुढे गेलेल्या निवडणुकीची तयारी महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे. मतदार यादीची जुळवाजुळव केली जात असून, निवडणूक प्रक्रियेसाठी लागणाऱ्या एकूण सुमारे १० हजार मनुष्यबळाचे नियोजन केले आहे. शहरात यंदा २०० मतदान केंद्रे वाढणार असून, २१२ झोनल अधिकाऱ्यांची गरज लागणार आहे. त्यादृष्टीनेही प्रशासन तयारी करीत आहे.

महापालिकेने (nmc) जिल्ह्यातील विविध खासगी, तसेच शासकीय शाळा, महाविद्यालय आदी सुमारे चारशे संस्थांना पत्र देत मनुष्यबळाची मागणी केली होती. काहींच्या याद्या वेळेत न मिळाल्यामुळे त्यांना दुसरी नोटीस बजावण्यात घेऊन कारवाईचा इशारा दिल्यानंतर सर्व संस्थांनी यादी महापालिकेला दिली आहे.

महापालिका प्रशासन सुमारे १६०० मतदान केंद्रे तयार करणार असून, त्यासाठी विविध प्रकारचे २१२ झोन (विभाग) तयार करून प्रत्येक झोनवर एक अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित केली आहे. एका मतदान बूथ केंद्रावर एकूण पाच सेवक राहणार आहेत. यासाठी यादी तयार करण्यात आली आहे. दरम्यान, महापालिका प्रशासनाने शहरातील एकूण ४४ प्रभागांसाठीची मतदारयादी जोडण्याचे काम सुरू केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये दुष्काळाचं सावट; दर मिळत नसल्याने शेतकऱ्याने दोन एकर केळीची बाग केली उद्ध्वस्त

Babar Azam : बाबर आझम पुन्हा स्वस्तात बाद, बाऊंड्रीवरच चाहत्यांनी त्याला घेरले, सपोर्ट स्टाफ पळत आला अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT