tax  esakal
नाशिक

Nashik News : प्रभाग अधिकारी, विभाग प्रमुखांचे पगार थांबवा; महापालिका आयुक्तांचे आस्थापना विभागास आदेश

महानगरपालिका प्रशासनाने मालमत्ता कर, पाणीपट्टी, संकीर्ण कर वसुलीसाठी जोरदार मोहीम सुरु केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : येथील महानगरपालिका प्रशासनाने मालमत्ता कर, पाणीपट्टी, संकीर्ण कर वसुलीसाठी जोरदार मोहीम सुरु केली आहे.

मात्र विभागप्रमुखांनी त्यांच्या अखत्यारीतील सर्व कर्मचारी घरपट्टी व पाणीपट्टी भरल्याबाबतचा अहवाल सादर न केल्याने सर्व प्रभाग अधिकारी व विभागप्रमुखांचा जानेवारी २०२४ चा पगार थांबविण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक रवींद्र जाधव यांनी आस्थापना विभागास दिले आहेत. (Municipal Commissioner order to Establishment Department nashik news)

जाधव यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकीदार तसेच संकीर्ण कर वसुली विभागाकडील गाळेधारक व इतर थकबाकीदार यांच्यावर धडक कारवाईसाठी विशेष पथक केले आहे. संबंधित विभागप्रमुखांना याबाबत आदेश दिले आहेत. फेब्रुवारी २०२४ अखेर थकबाकीच्या रकमेत व्याजावर ७० टक्के सवलत दिली असून याबाबत थकबाकीदारांशी संपर्क साधून दैनंदिन वसुलीचा इष्टांक सर्व प्रभाग कार्यालयाने गाठावा, असे निर्देश सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना दिले.

आढावा बैठकीत प्रामुख्याने कर वसुलीवर भर देण्याचा मुद्दा केंद्रस्थानी होता. मोठ्या थकबाकीदारांवर कठोर कारवाईचे निर्देश देतानाच अनधिकृत नळ जोडणीधारकांना नळ जोडणी अधिकृत करण्यासाठी संधी देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

शहरातील सर्व थकबाकीदारांनी आपल्याकडे थकीत सर्व करांची रक्कम मनपाच्या चारही प्रभाग कार्यालयांत सुट्टीच्या दिवशीही भरणा करून मालमत्ता जप्ती तसेच इतर कटू कारवाई टाळावी आणि अनधिकृत नळ कनेक्शनधारकांनीही आपले नळ कनेक्शन अधिकृत करून घ्यावे. यासाठीच्या रकमेचा तत्काळ भरणा करून कटू कारवाईचा प्रसंग टाळण्याचे आवाहन जाधव यांनी केले आहे.

बैठकीस अतिरिक्त आयुक्त राजेंद्र फातले, उपायुक्त सुहास जगताप, हेमलता डगळे, लेखाधिकारी राजू खैरनार, सहाय्यक आयुक्त अनिल पारखे, सचिन महाले, हरिश डिंबर, शहर अभियंता कैलास बच्छाव, उपअभियंता शांताराम चौरे, सचिन माळवाळ, मुख्य अग्निशमन अधिकारी संजय पवार, नगरसचिव साजिद अन्सारी, जनसंपर्क अधिकारी पंकज सोनवणे, प्रभाग अधिकारी फय्याज अहमद, भरत सावकार, अधिक्षक रमाकांत धामणे, संतोष गायकवाड, श्याम कांबळे, नीलेश पाटील, दिव्यांग कक्ष प्रमुख अब्दुल कादीर लतीफ, वाहन विभाग प्रमुख अनिल कोठावदे, प्रमुख स्वच्छता निरिक्षक एकबाल जान महम्मद, आनंदसिंग पाटील, अभिलेखा विभाग प्रमुख जुबेदा अन्सारी, जनगणना विभागप्रमुख कांताबाई सोनवणे इत्यादी विभागप्रमुख उपस्थित होते.

अनधिकृत नळजोडण्या पाणीपट्टी भरून कायम

महानगरपालिका कार्यक्षेत्रातील अनधिकृत नळ कनेक्शनधारकांकडून तीन वर्षांच्या पाणीपट्टी बदल्यात ७ हजार ८४० रुपये भरल्यास संबंधित नळधारकाला आपली नळ जोडणी अधिकृत करून घेता येईल. या मोहिमेत आयुक्तांनी अनधिकृत नळ जोडणीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक स्थापन केले आहे.

या पथकाद्वारे विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. पथकात प्रभाग पाणीपुरवठा अभियंता, विभागप्रमुख, संबंधित प्रभागाचे पाणीपुरवठा विभागाकडील मानधन अभियंता, संबंधित प्रभागाचे फिटर, दोन मजूर, व्हिडिओ कॅमेरामन आदींचा समावेश आहे. अनधिकृत नळ कनेक्शनधारकांनी या धोरणानुसार निर्धारित केलेली पाणीपट्टी न भरल्यास त्यांच्यावर मनपाची जलवाहिनी फोडणे, पाणी चोरी करणे, मनपा मालमत्तेची हानी केल्याप्रकरणी २५ हजार रुपये दंड करण्यात येईल.

''३१ मार्च २०२४ नंतर त्यापुढील प्रत्येक वर्षासाठी ५ हजार रुपये वसूल करण्यात येतील. तसेच अनधिकृत नळधारकाविरूद्ध संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल होणार आहे. या संधीचा अनधिकृत नळजोडणी धारकांनी लाभ घेण्याचे आवाहन आयुक्त जाधव यांनी केले आहे.''-आयुक्त तथा प्रशासक, मालेगाव महानगरपालिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE: what a throw! पाकिस्तानी खेळाडूने अम्पायरला चेंडू फेकून मारला, वसीम अक्रमने केलं कौतुक! सोशल मीडियावर ट्रोल

Kharadi Traffic : खराडी-हडपसर रस्त्यावर बेशिस्त पार्किंग, वाहतूक कोंडी व अपघाताची शक्यता; नागरिकांची कारवाईची मागणी

Handshake Controversy Timeline : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची टप्प्याटप्प्याने कशी नाचक्की होत गेली ते वाचा... Andy Pycroft प्रकरण त्यांच्यावरच कसं उलटलं?

Latest Maharashtra News Updates : लासलगावमध्ये एकतर्फी प्रेमाच्या संशयातून तरुणावर कोयत्याने हल्ला...

Family Travel Tips: फॅमिलीसोबत प्रवासात निघालात? डिहायड्रेशनपासून बचावासाठी ही फळं सोबत ठेवा!

SCROLL FOR NEXT