nmc and pwd 
नाशिक

Nashik News : सेंट्रल पार्क अनियमिततेत बांधकाम विभागाचा हात; आमदाराच्या सहभागाने भाजप पुन्हा चर्चेत

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : सिडकोतील सेंट्रल पार्कचे दुसऱ्या टप्प्यातील काम विशिष्ट ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून देताना झालेल्या अनियमिततेत महापालिकेच्या बांधकाम विभागांसह लेखापरिक्षण, लेखा विभागातील अधिकारी सहभागी असून, तांत्रिक समिती समोर अटी- शर्तींचा भंग होत असल्याचे समोर येऊनही दुर्लक्ष करण्यात आले आहे.

ड्रग्ज रॅकेटप्रकरणी काँग्रेसने शहरातील भाजप आमदाराचा सहभाग असल्याचा आरोप केल्याने पक्ष अडचणीत सापडला असताना आता सेंट्रल पार्कच्या कामात रिंग करून ठराविक ठेकेदाराला काम देण्यासाठी दबाव टाकण्यात भाजपच्याच आमदाराचा हात असल्याची चर्चा असल्याने यावरूनदेखील पक्ष अडचणीत आला आहे.

याप्रकरणात महापालिकेचा बांधकाम विभाग सहभागी असल्याचे समोर आले आहे. दुसऱ्या टप्प्यातील जवळपास वीस कोटी रुपयांचे काम देताना तांत्रिक समितीने तपासणी करणे अपेक्षित होते, ते झाले नाही. (Municipal construction department involved in Central Park irregularities nashik news)

तांत्रिक समितीमध्ये अतिरिक्त आयुक्तांसह लेखा परिक्षक, लेखा विभाग, शहर अभियंता, कार्यकारी अभियंता यांचा समावेश असतो. अटी- शर्तींची तांत्रिक तपासणी करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असते. त्याप्रमाणे तपासणी झालेली नाही. हिरावती नामक कंपनीने अटी- शर्तींवर आक्षेप घेणारे पत्र बांधकाम विभागाला दिले होते. परंतु त्या पत्राला उत्तर न देता त्यापूर्वीच ठेकेदार निश्चित करण्यात आला.

वंजारी, पाटोळेंचे खोटे दावे, काम रद्द

चुकीच्या पद्धतीने काम दिल्याचा प्रकार समोर आल्यानंतर शहर अभियंता शिवकुमार वंजारी व बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जितेंद्र पाटोळे यांनी सारवासारव केली. श्री. वंजारी यांनी कार्यारंभ आदेश अद्याप दिले नाही. या प्रकरणाची चौकशी करून कार्यारंभ आदेश रद्द करणार असल्याचे सांगितले. तर, पाटोळे यांनी संबंधित कंपनीने दिलेल्या माहितीबद्दल अनभिज्ञ असल्याचे सांगितले. यावरून वंजारी व पाटोळे हे एकतर डोळे मिटून काम करत असल्याचे स्पष्ट होते किंवा दोघांनी विशिष्ट ठेकेदाराला काम मिळावे, यासाठी सोईस्कर भूमिका घेतल्याचे स्पष्ट होते.

खुलाशाकडे सोईस्कर दुर्लक्ष

सेंट्रल पार्कचे काम घेण्यासाठी सात कंपन्यांनी निविदेत सहभाग घेतला. त्यातील एका कंपनीने अटी- शर्तींवरून बांधकाम विभागाला पत्र दिले. त्या पत्रावर खुलासा करण्याची जबाबदारी वंजारी व पाटोळे यांची असताना खुलासा न करता काम दिले. रेडीमिक्स काँक्रिट प्लॅन्ट असावा, इलेक्ट्रिक, लॉन्स, उद्यान तसेच अन्य अशा प्रत्येक कामाचा अनुभव यासारख्या अटी एकाच ठेकेदार कंपनीकडून कसे शक्य आहे, असे पत्र एका कंपनीने दिले होते. त्यावर खुलासा देण्याऐवजी पत्राकडे दुर्लक्ष करण्यात आले.

आमदारांसह माजी नगरसेवकांचा सहभाग

विशिष्ट ठेकेदाराला काम देण्यासाठी भाजपच्या एका आमदाराचा सहभाग असल्याची बाब समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी भाजपच्या एका आमदाराचा एमडी ड्रग्ज प्रकरणात हात असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. त्यामुळे भाजप चर्चेत आला असताना आता सेंट्रल पार्कच्या अनियमित कामे वाटपावरून भाजपचेच आमदार पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

पत्र माघारीच्या हालचाली

या प्रकरणाला वाचा फोडण्यात पंचवटीतील काँग्रेसच्या माजी नगरसेविकेचा मुलगा व अपक्ष माजी नगरसेवकाने पत्र दिल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर सिडकोतील भाजपचा एका माजी नगरसेवकाचीदेखील त्याला साथ आहे. परंतु आता दबावातून चौकशीचे पत्र माघारी घेतले जात आहे. अर्थपूर्ण चर्चेतून दबाव कमी झाल्याची चर्चा आहे.

काय आहे प्रकार?

सिडकोतील पेलीकन पार्कसाठी दुसऱ्या टप्प्यासाठी जवळपास वीस कोटींचा निधी देवू केला आहे. कामे देताना विशिष्ट ठेकेदारांसाठी अटी- शर्तींचा भंग झाला. सेंट्रल पार्कमध्ये एंटरन्स प्लाझा, अम्युझमेंट पार्क, फूड कोर्ट, सायनेस बोर्ड, बेंचेस, डस्टबिन, स्टेज लाइट, साउंड व्यवस्था, सुलभ टॉयलेट ब्लॉक, पार्किंग, ॲडव्हेंचर पार्कचे काम केले जाणार आहे. या कामांसाठी अनुभवाची विशिष्ट अट ठेवली.

वास्तविक अनुभवाच्या सर्वच अटी पूर्ण करणे शक्य नसल्याने ही अट टाकल्याचा आरोप आहे. ज्या ठेकेदार कंपनीला काम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या कंपनीने दाखविलेला नफा, प्रकल्पाच्या किमतीनुसार काम करण्याची क्षमता नसणे, ॲडव्हेंचर पार्कसाठी स्वतंत्र कंपनी संलग्न करण्याच्या अटीचा भंग, बांधकाम विभागाने सर्व प्रक्रिया एकाच दिवशी पार पाडण्याची केलेली घाई, कमी दराने निविदा भरलेल्या ठेकेदार कंपन्यांना अपात्र करणे, तांत्रिक कारणे देऊन कमी दराने काम करण्याची तयारी दाखवणाऱ्या कंपन्यांना खुलासा करण्याची संधी न देणे यामुळे सेंट्रल पार्क वादात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपनं केलं की अमर प्रेम, आम्ही केलं की लव्ह जिहाद का? काँग्रेस, एमआयएमशी युतीवरून ठाकरे बंधूंचा प्रहार

Bigg Boss Marathi 6 Live Update: लीलाच्या एजेची राकेश बापटची 'बिग बॉस मराठी ६' मध्ये एंट्री

बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी, शिल्पा शेट्टीच्या बहिणीला केलंय डेट ! मराठी बिग बॉसमध्ये कसा असणार राकेशचा अंदाज ?

Bigg Boss Marathi 6 : घरची गरीबी, थॅलेसेमियाशी झुंज देणाऱ्या रीलस्टार डॉन प्रभू शेळकेची Entry !

Latest Marathi News Live Update : मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक, मुंबईसाठी एक व्हा; राज ठाकरेंचं आवाहन

SCROLL FOR NEXT