NMC Nashik News esakal
नाशिक

NMC News: महापालिकेतर्फे पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे नागरिकांना आवाहन

सकाळ वृत्तसेवा

NMC News: दिवाळीनिमित्ताने महसुलात वाढ व्हावी, या उद्देशाने महापालिकेच्या वतीने फटाके गाड्यांचा लिलाव करणाऱ्या प्रशासनाने नागरिकांना पर्यावरणपूरक अर्थात हरित फटाके फोडण्याचे व तेही रात्री दहानंतर, असे आवाहन केल्याने महापालिकेच्या या भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (Municipal corporation appeals to citizens to have an environment friendly Diwali nashik news)

राज्यात मुंबई व पुणे या दोन शहरांमध्ये प्रदूषणाने पातळी गाठल्याने राज्य शासनाने विशेष उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने राज्यात वेगाने वाढणाऱ्या तिसऱ्या शहरांमध्ये नाशिकचा क्रमांक लागतो, म्हणून नाशिक महापालिकेने पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे.

त्या अनुषंगाने पर्यावरणपूरक फटाके फोडण्याचे आवाहन नाशिककरांना केले आहे. हवा, ध्वनी, जल व मृदा प्रदूषण वाढू नये यासाठी फटाके मोठ्या प्रमाणात वाजू नये व लहान मुलांनी धोकादायक असलेले फटाके वाजवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

फटाके फोडताना शक्यतो रात्री दहानंतरच फोडावे. फटाका वाजलेल्या स्थानापासून चार मीटर अंतरापर्यंत १४५ डेसिबलच्या १२५ डेसिबल ध्वनी पातळीचे उल्लंघन करणाऱ्या फटाक्यांचे उत्पादन व विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे.

महापालिकेच्या वतीने पर्यावरणपूरक व फटाक्यांचे उत्पादन करण्यास मनाई करण्यात आल्याचे आदेशित करताना याच महापालिकेने उत्पन्नवाढीसाठी गाड्यांचे लिलाव केल्याने महापालिकेच्या दुटप्पी भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bus Fare Hike: बसमधून प्रवास करणे महागणार! प्रवासात खिसा रिकामा, मिरा-भाईंदर पालिकेचा बस भाडेवाढीचा प्रस्ताव

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे अजूनही सर्वोच्च न्यायालयात, इंडिया आघाडीचे नेतेही उपस्थित

निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडी आक्रमक, राहुल गांधींसह ११ नेत्यांनी दाखल केली याचिका, सुनावणी कधी?

Laptop Mobile Cleaning Tips: मोबाईल बाथरूमपासून बेडरूमपर्यंत कुठेही नेता? मग जंतूंचा संपर्क कमी करण्यासाठी स्वच्छतेच्या 'या' टिप्स वापराच

रेल्वे प्रवासात प्रवाशांची घुसमट, अपुऱ्या सुविधांमुळे दररोज गर्दीशी सामना; अतिरिक्त लोकलची मागणी

SCROLL FOR NEXT