photographer.jpg 
नाशिक

महापालिका अधिकाऱ्यांची पत्रकाराला मारहाण; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 

प्रमोद दंडगव्हाळ

सिडको (नाशिक) : महापालिका कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या सुरू असलेल्या धिंगाण्याचे छायाचित्र काढणाऱ्या सिडकोतील पत्रकारास बेदम मारहाण करत शिवीगाळ करणाऱ्याविरोधात अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक नखाते पुढील तपास करीत आहे.

मद्यपान करताना काढले फोटो

पत्रकार निशिकांत पाटील बुधवारी (ता.१३) रात्री पाथर्डी फाट्याहून अंबडकडे जात होते. या वेळी पाथर्डी फाट्याजवळील महापालिकेच्या पाण्याच्या टाकीजवळ गोंधळ सुरू असल्याचे दिसून आले. ते पाहण्यासाठी पत्रकार पाटील गेले असता त्यांना महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे शैलेश झिटे, ललित भावसार यांच्यासह अन्य दोघे मद्यपान करीत असल्याचे दिसून आले. या वेळी पाटील यांनी त्यांचे छायाचित्र काढण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना शिवीगाळ व दमदाटी करून लाथ्याबुक्यांनी मारहाण केली. हा प्रकार घडल्यानंतर पाटील यांनी अंबड पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

तीन जणांना अटक, एकजण फरारी  

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून शैलेश रमेश झिटे (४२, रा. सिडको), अक्षय दीपक निकम (२४, अश्विननगर), ज्ञानेश्वर सखाराम शिंदे (३८, पाथर्डी फाटा) यांना अटक केली. कनिष्ठ अभियंता ललित भावसार यांचा पोलिस शोध घेत आहे. यासंदर्भात तीन जणांना अटक केली असून, एकजण फरारी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी ! पगार अन् पेन्शनमध्ये होणार मोठी वाढ, पुढील आठवड्यात सरकार करणार घोषणा ?

Dharashiv News: २५% अटीत अडकली दहिफळची दारूबंदी चळवळ!; महिलांचा निर्धार ठाम.

Latest Marathi News Live Update : खरातची अज्ञातस्थळी चौकशी, एसआयटीने चौकशीचं ठिकाण बदललं

IPL 2026: 'एक मिनिटही वाया घालवू नका, गेल्यावर्षी जिंकलो त्यामुळे...' विराट कोहलीचा RCB च्या खेळाडूंना सल्ला

Plant Care in Summer: कडक उन्हात बाग वाचवायची कशी? जाणून घ्या सोपे उपाय!; उन्हाळ्यात झाडांची ‘तहान’ भागवा

SCROLL FOR NEXT