nmc 
नाशिक

NMC Recruitment: महापालिका नोकरभरती अंतिम टप्प्यात

सकाळ वृत्तसेवा

NMC Recruitment : महापालिकेच्या अग्निशमन, वैद्यकीय विभागातील ५८७ पदांच्या नोकरभरतीसाठी संवर्गनिहाय आरक्षित जागांची संख्या निश्चिती करण्यात आली आहे. उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी टीसीएसच्या माध्यमातून ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. (Municipal recruitment in final stage nashik news)

नाशिक महापालिकेत यापूर्वी ७०९२ पदे मंजूर आहे. परंतु ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त झाल्याने पदांची संख्या वाढली आहे. सध्या जुन्या आराखड्याप्रमाणे काम सुरू आहे. परंतु जवळपास तीन हजार पदे रिक्त आहेत. त्यामुळे अपुऱ्या मनुष्यबळावर महापालिकेचे कामकाज सुरू आहे. महापालिकेला महसुली खर्चामुळे भरती करता येत नाही.

परंतु कोरोनाकाळात शासनाने आवश्‍यक बाब म्हणून वैद्यकीय विभागाच्या ७०६ पदांना भरतीसाठी परवानगी देण्यात आली. नोकरभरतीसाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला (टीसीएस) काम देण्यात आले. ‘अ’ संवर्गातील पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होत असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांची ८२ पदे वगळण्यात आली.

६२४ पदांमधून अग्निशमन विभागातील ३७ ड्रायव्हरची पदे वगळण्यात आली. त्यामुळे एकूण ५८७ पदांसाठी टीसीएसमार्फत नोकरभरतीची प्रक्रिया राबविली जाणार आहे. महापालिका व टीसीएसमध्ये करार करण्यात आला आहे. २६ संवर्गातील ५८७ पदांकरिता आरक्षणे निश्‍चित करण्यात आली.

जातीनिहाय आरक्षित पदे, पदवीधर, दिव्यांग, क्रीडा, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्तांसाठी राखीव पदांची निश्चिती करण्यात आली असून, त्यानुसार पदभरती होणार आहे. पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. वेबसाइटचे काम अंतिम टप्प्यात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story : जळगाव रेल्वे स्टेशनवर सापडलेली माला झाली 'महसूल सहायक', नोकरीच्या पहिल्याच दिवशी मिळणार अनोखी भेट

Nagpur News: महिला पोलिसांच्या चिमुकल्यांना मिळणार ‘चिमणीघर’ची माया; पोलिस आयुक्तांकडून उद्‍घाटन, बंद पडलेले ‘पाळणाघर’ पुन्हा सुरू

धक्कादायक घटना! 'सुरक्षारक्षकाचा पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार'; बेलतरोडीतील सिंगापूर कॉलनीतील घटना, नागपूर जिल्ह्यात खळबळ

Cough Syrup: चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर सरकारला अॅक्शन मोडमध्ये, औषधांच्या गुणवत्तेबद्दल आणि वापरावर मोठा निर्णय घेतला

Latest Marathi News Live Update: सरकारी जमिनीवर बांधलेल्या बेकायदेशीर बांधकामांवर प्रशासनाने तोडफोड मोहीम

SCROLL FOR NEXT