amol varhe 1.jpg 
नाशिक

निनावी पत्रावरून पोलीसांनी लावला शोध, हाती लागली धक्कादायक माहिती

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक ग्रामीण पोलिसांकडे एक निनावी पत्र आले. त्या पत्रात लिहिल्याप्रमाणे पोलीसांनी शोध घ्यायला सुरूवात देखील केली. पण जेव्हा जसे जसे त्या शोधाच्या खोलात शिरले. तेव्हा खुप काही गोष्टींचा खुलासा झाला. आणि धक्कादायक माहिती समोर आली. काय घडले नेमके?

काय होते निनावी पत्रात...?

नगरसूल (ता.येवला) येथील अमोल वऱ्हे चार महिन्यांपासून गायब झाला होता. त्याचा खून वडील, भाऊ आणि नातेवाईक यांनी करुन त्याचे प्रेत लोहशिंगवे येथील जंगलात पुरुन टाकलेले आहे, अशा आशयाचे पत्र नाशिक ग्रामीण पोलिसांना डिसेंबर महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यात प्राप्त झाले. त्यानुसार पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी शहानिशा करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या. पोलिसांनी अमोलच्या मित्रांकडे चौकशी केली. त्याआधारे पोलिसांनी शहनिशा करत तपास सुरु केला. पोलीस तपासात धक्कादायक घटना उघडकीस आली.

पोलीसांच्या चौकशीत धक्कादायक माहितीचा खुलासा

३० ऑगस्ट २०२० रोजी त्याच्याशी शेवटचे बोलणे झाले. तेंव्हापासून त्याचा मोबाईल बंद येत असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. अमोलचा घातपात झाला असावा, असा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी त्याच्या दोन भावांसह वडिलांकडे चौकशी केली असता त्यांनी खूनाची कबुली दिली. खूनाचे कारण विचारले असता पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. अमोलला दारु पिण्याचे व्यसन होते. तो नशेमध्ये आई-वडिलांना मारहाण करायचा. घटनेच्या दिवशीसुद्धा त्याने आईवडिलांना मारहाण केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आली आहे. याप्रकरणी येवला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिघांची स्वतंत्रपणे चौकशी
पोलिसांनी अमोलच्या वडिलांसह दोन सख्ख्या भावांना ताब्यात घेतले. तिघांची स्वतंत्रपणे चौकशी केली. तिघेही लपवालपवी करत असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी कसून चौकशी केली असता पित्राच्या महिन्यातील रविवारी ९.३० वाजता अमोलला राहत्या घरात दोरीने गळफास दिला. आणि त्याच्या मृतदेहास दगड बांधून गोदावरी नदीच्या वाहत्या पाण्यात मळेगाव (ता. कोपरगाव) येथे फेकल्याची कबुली तिघांनी दिली.लमद्यधुंद अवस्थेत आई व वडिलांना मारहाण करणार्‍या मुलाचा गळा आवळून खून केल्याचे उघडकीस आले.

दगड बांधून नदीत फेकला मृतदेह

पुरावे नष्ट करण्यासाठी मुलाच्या मृतदेहास दगड बांधून गोदावरी नदीच्या पाण्यात फेकून दिल्याचे तपास समोर आला आहे. विशेष म्हणजे, मुलगा गायब किंवा मयत झाल्याची तक्रार नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात दिली नसल्याचे समोर आले आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी निनावी पत्राच्या आधारे कसोसीने शोध घेत खूनाचा छडा लावला.अमोल सोमनाथ वर्हे (वय १९) असे खून झालेल्याचे नाव आहे. वडील सोमनाथ आसाराम वर्हे (वय ५०), भाऊ भीमराज सोमनाथ वर्हे (वय २४), किरण सोमनाथ वर्हे (वय २०) अशी खून करणार्‍यांची नावे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Century : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! KKR विरुद्ध शतकी खेळी अन् आशियात कोणालाच न जमलेला केला पराक्रम...

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला खूप मोठा धक्का! मॅच विनर खेळाडूला दुखापत, उपचारासाठी लंडनला जाणार; स्पर्धेतून माघार निश्चित

IPL 2026 Playoff Scenario: विराट कोहलीचा झंझावात अन् RCB गुणतालिकेत अव्वल! KKR चे आव्हान संपले का? जाणून घ्या समीकरण

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

SCROLL FOR NEXT