murder wife.jpg 
नाशिक

पत्नीच्याही डोक्यात कुऱ्हाडीने वार..अन् स्वत:ही..

सकाळ वृत्तसेवा

नाशिक  : दहेगाव (ता. चांदवड) येथे कौटुंबिक कलहातून एकाने पत्नीच्या डोक्‍यात कुऱ्हाडीने वार करून खून करत स्वत:ही मनमाड-मालेगाव महामार्गावर वाहनाखाली आत्महत्या केली. 

अशी घडली घटना...

नितीन बकाजी कडनोर (वय 42) व सुनीता नितीन कडनोर (37) अशी या दोघांची नावे आहेत. मंगळवारी (ता. 28) सकाळी सुनीता कडनोर दहेगाव शिवारातील लकडे मळा, पाटसरी येथे स्वत:च्या शेतात कांदालागवडीसाठी गेली होती. शेतात रोप उपटत असताना नितीन कडनोर याने अचानक पाठीमागून येऊन तिच्या डोक्‍यात व अंगावर कुऱ्हाडीने वार केले. वर्मी घाव लागल्याने सुनीताचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर नितीनने तेथून पळ काढला. मात्र, मोटारसायकलने मनमाड-मालेगाव महामार्गावरून मालेगावकडे जात असताना त्याने मालेगावहून मनमाडकडे येणाऱ्या एका वाहनाच्या समोर दुचाकी घालून आत्महत्या केली. चांदवड पोलिसांना याबाबत माहिती मिळताच पोलिस निरीक्षक हिरालाल पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. दरम्यान, नितीनच्या मागे वयोवृद्ध आई-वडील, तीन मुली व मुलगा असा परिवार आहे. त्यांची मोठी मुलगी शालेय शिक्षणासाठी मामाकडे आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: सुप्रीम कोर्टाचा मोठा ‘गेमचेंजर’ निर्णय! ‘तारीख पे तारीख’चा खेळ थांबवला! काय आहे नवा फॉर्म्युला?

संजू सॅमसनला पुढचा MS Dhoni होण्याची गरज नाही, तो...! गौतम गंभीरच्या विधानाची चर्चा; शशी थरूर यांच्या वक्तव्यावर दिलं उत्तर

Latest Marathi News Live Update : नवी मुंबईत गुढीपाडव्याचा उत्साह ; महिलांची भव्य बाईक रॅली

Ashok Kharat Case : महिलांच्या शोषणासाठी अशोक खरातला आयोगाच्या अध्यक्षांचेच अभय ? रुपाली पाटील ठोंबरे यांच्या दाव्याने खळबळ

'मी दारु पिणं सोडलं, कारण...', भारतीय स्टार क्रिकेटरने IPL 2026 पूर्वी घेतला मोठा निर्णय; सर्वकाही स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT