murder of an 77 year old farmer Sakal
नाशिक

वृद्ध शेतकऱ्याची कुऱ्हाडीने वार करुन हत्या, परिसरात खळबळ

प्रशांत बैरागी

नामपूर (जि. नाशिक) : बागलाण तालुक्यातील कोटबेल येथे वयोवृद्ध शेतकऱ्याचा कुऱ्हाडीने निर्घृण खून झाल्याची घटना २३ सप्टेंबरला रात्रीचे २ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनी काही वेळातच एका संशयित आरोपीला अटक केली आहे.

कोटबेल येथील घुबडदरा शिवारात वयोवृद्ध शेतकरी सहादू रामचंद्र खैरनार (वय - ७७ वर्ष) हे आपल्या पत्नीसह शेतात राहत होते. काल रात्रीच्या सुमारास धारदार शस्त्राने त्यांच्या मानेजवळ व पाठीवर वार करून त्यांचा खून झाल्याची धक्कादायक घटना कोटबेल येथे घडली असून त्याचवेळी जायखेडा पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी व सहकारी परिसरात रात्र गस्त करीत असताना त्यांना ही घटना समजली. पोलिसांनी रात्रीतून परिसर पिंजून काढत मुख्य आरोपीस पकडले. सदर घटनेचा गुन्हा दाखल करून त्यास कोठडीत ठेवले आहे

परिसरातील शेतकरी धास्तावले

नेमका खून कोणत्या कारणास्तव झालेला आहे हे अजून समजू शकले नाही. सदर गुन्ह्याचा पुढील तपास जायखेडा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी हे करीत आहेत. त्यांच्या ह्या धडक कामगिरीबद्दल परिसरात त्यांच्या कौतुकाच्या चर्चेला उधाण आले आहे. सदर शेतकऱ्याच्या खुनाने परिसरातील शेतकरी धास्तावले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Municipal Election : मुंबईसाठी ‘राष्ट्रवादी’ची यादी जाहीर; भाजपला धक्का, मलिक यांच्या कुटुंबातील तिघांना उमेदवारी

Video: 'त्या' एका व्हिडिओमुळे जान्हवी किल्लेकर ट्रोल, संतापून उत्तर देत म्हणाली...'पुर्णपणे माहिती नसताना...'

Latest Marathi News Live Update : उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी कुलदीप सेंगरच्या जामिनाच्या विरोधात आज सुनावणी

BMC Election नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर आणि किरीट सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी, एबी फॉर्मचं वाटप सुरू

farmer Success Story: माळरानावर फुलवली बोरांची बाग; कष्टातून मिळतय अडीच लाखांचे उत्पादन ; बोधेगावातील तरुणाचा यशस्वी प्रयोग!

SCROLL FOR NEXT